शिक्षक ध्येय १ ऑगस्ट २०२२ : राहा नेहमी सकारात्मक... संपादकीय... स्वतःवर ताबा ठेवा - बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की काहीही नकारात्मक विचार करणार नाही , परंतु आपल्या अवती भोवती घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम करून मनस्ताप करून घेतो. असं होऊ नये या साठी आपल्याला स्वतःवर ताबा ठेवणे महत्वाचे आहे. ध्यान करा - आपल्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान सर्वोत्तम मानले आहे. मन शांत असेल तर एकाग्रतेमुळे सकारात्मक विचार येतात. ध्यान केल्याने ऊर्जा मिळते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. या मुळे माणूस कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम होतो. सकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी भेटा -प्रत्येकामध्ये वैचारिक मतभेद असतातच. काही लोक सकारात्मक विचारांचे असतात , तर काही लोक नकारात्मक विचारसरणीचे असतात. नेहमी आपण सकारात्मक विचार असणाऱ्याशी भेटावे. जेणे करून त्यांचे सकारात्मक विचार आपल्याला पुढे वाढण्यासाठी प्रवृत्त करतील. म्हणून नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या संपर्कात राहावे. आपल्या लक्ष्यावर स्थिर राहा - आपले ध्येय किंवा लक्ष्य आपल्य...
कौशल भारत - कुशल भारत