★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...
अंक वाचण्यासाठी...
स्पर्धा विशेषांक साप्ताहिक शिक्षक ध्येय, वर्ष ६ वे, अंक १६ वा, सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५
संपादकीय...
उपक्रमशील शिक्षकांच्या अपेक्षा..
सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणार्या आपल्या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आजूबाजूला नजर फिरविली असता प्रत्येक गल्लीत कोचिंग क्लास धुमधडाक्यात सुरू आहेत. आज बहुतेक जण आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात. खासगी क्लास लावले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, व्यावसायिक आणि शिक्षक यांची मुले देखील खासगी शाळेत शिकत आहेत. खरे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देत असतील तर सरकारी शैक्षणिक संस्था मागे का आहेत? हा प्रश्न समाजाने विचारायला हवा. आपल्या देशातील बर्याच राज्यातील सरकारी शाळांची नेमकी स्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक राज्यातील शिक्षण विभागात भरती नाही, अनेक पदे रिक्त आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद, आश्रमशाळा, महानगरपालिका तसेच इतर सरकारी शाळा केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर विकसित केल्या पाहिजेत. आज गरीब मुलांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंत मुलांसाठी खासगी शाळा असे दोन भाग उदयास येत आहे. गरीब व श्रीमंत सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. शाळा कोणतीही असो पण एक देश, एक शिक्षण, एक गुणवत्ता असायला हवी. सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळायला हवी.
राज्यातील शाळांमध्ये उपक्रमशील शिक्षक किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. शैक्षणिक क्षेत्रात शालेय तसेच सामाजिक पातळीवर उपक्रमशील शिक्षकाकडे पाहण्याचा सहकारी शिक्षकांचा दृष्टिकोन अजूनही स्वच्छ नाही. एकतर १० पैकी एका शाळेत एक किंवा दोन उपक्रमशील शिक्षक असतात. त्यांनाही शालेय तसेच सामाजिक स्तरावर प्रोत्साहन दिले जात नाही, ही एक शोकांतिका आहे. उपक्रमशील शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना सर्व पातळीवर सहकार्य मिळणे गरजेचे आहे कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला प्रवास करण्याचा प्रयत्न करीत असतात.
उपक्रमशील शिक्षकांना कधीच पुरस्कार, बक्षीस, प्रमाणपत्र यांची अपेक्षा नसते. समाजाकडून सन्मान आणि इतर सहकारी शिक्षकांकडून सहकार्य एवढीच किमान अपेक्षा त्यांची असते.
संपूर्ण अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
संपादकीय...
प्रत्येक शिक्षकाने ‘विद्यार्थी घडविणे’ हेच ध्येय बाळगावे
साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’
हा ५ वा वर्धापन दिन विशेषांक आपल्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
राज्यात विविध शासकीय शाळा जसे की आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्रशाला, महानगर पालिका
शाळा तसेच विविध खासगी शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा सुरु आहेत. जागतिक स्तरावर
शिक्षण केंद्रांच्या आकडेवारीत आपला देश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील अनेक शाळांत जे जे चांगले घडत आहे,
परिवर्तन दिसत आहे, विद्यार्थी यशाची शिखरे सर करीत आहे, येथील शिक्षक नवीन उपक्रम
राबवीत कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत
आहे, यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, उत्कृष्ठ
शाळेतील आजचे खरे वास्तव समाजासमोर यावे यासाठीच या साप्ताहिकाची निर्मिती करण्यात
आली आहे. आज अंकाचे सुमारे ३ लाखापेक्षा जास्त वाचक आहेत. किंबहुना राज्यातील
प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाकडे हे पोहचले पाहिजे असा प्रयत्न आम्ही करीत
आहोत.
नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. याची
अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज आहे. शैक्षणिक धोरणात कला, व्यावसायिक शिक्षण,
पौढ शिक्षण, जल व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, योगा, शेती तंत्रज्ञान आणि शिक्षणात
तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश करणे आवश्यक आहे. इतर देशात व्यावसायिक शिक्षण
शाळेतच दिले जाते. अमेरिकेत ५२ टक्के, जर्मनीत ७५ आणि कोरियात ९६ टक्के विद्यार्थी
शाळेतच व्यवसायाचे धडे गिरवतात. भारतात हेच प्रमाण अवघे ५ टक्के आहे.
काळानुसार शिक्षक बदलला
तरच विद्यार्थी बदलतील.
आज बऱ्याच शाळा डिजिटल झालेल्या आपण
पाहतो. डिजिटल खोली, फर्निचर, रंगरंगोटी, विद्युत झगमगाट केला म्हणजे शाळा डिजिटल
होत नाही. आजही काही शाळा डिजिटल असूनही तिथे विद्युत जोडणीच नाही तर काही ठिकाणी
संगणक असूनही वापर नाही. काही ठिकाणी डिजिटल रुममध्ये विद्यार्थ्यांनाच प्रवेश
नसतो. खर तर डिजिटल ई-क्लास, ई-लर्निंग हे सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पूरक
आहे. शासन, साहित्य, सुविधा यांवर उणिवांचे खापर न फोडता प्रत्येक शिक्षकाने
‘विद्यार्थी घडविणे’ हेच ध्येय बाळगावे, हीच एक माफक अपेक्षा!
नेहमीच साप्ताहिकातील विविध लेखांच्या माध्यमांतून विविध
शाळांमधील अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी याचे कार्य व यश समाजापुढे प्रस्तुत करणे
याच उद्देशाने हे शिक्षक ध्येय साप्ताहिक सुरु करण्यात आले आहे.
५ वा वर्धापन
दिन विशेषांकाचे सर्वांकडून स्वागत होईल आणि आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.
★ शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका..._
★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...
अंक वाचण्यासाठी...
_★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध_
विद्यार्थ्यासाठी खालील ठिकाणी आजचा अंक उपलब्ध
★ *_शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ..._*
*_संकेतस्थळ आजच भेट द्या.._*
*_शिक्षक ध्येय कुटुंब ऍप_*
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (33,017 सदस्य)
*_कौशल्य विकास कुटुंब ॲप_*
*_यु ट्यूब चॅनल_*
*_ब्लॉग: नोकरीच्या जाहिराती_*
*_टेलीग्राम:_*
*_इंस्टाग्राम:_*
*_फेसबुक:_*
*_फेसबुक पेज:_*
*_फेसबुक पब्लिक ग्रुप:_*
*_ट्विटर_*
*_लिंकडीन_*
*_ई मेल:_*
*_153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य_*
शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
.jpg)