Skip to main content

Posts

Showing posts with the label लॉकडाऊन मधील शिक्षण

भारतीय क्रीडा प्राधिकरण

  शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदाच्या ३२० जागा पद : प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक पदसंख्या : एकूण ३२० जागा मानधन : रु. ४१ , १२०/- ते १ , ५० , ०००/- (पदानुसार) शैक्षणिक पात्रता : एसएआय , एनएस एनआयएस किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठातून किंवा कोचिंगमधून डिप्लोमा , ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त वयोमर्यादा : दि. २० मे २०२१ रोजी कमाल ४०/४५ वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० मे २०२१ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://drive.google.com/file/d/ 1 cJXyJM-V 6 CblaYcnjw 86 R 2 V 25 oLwfvA 7/ view?usp=drivesdk

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

  अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा   साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा “ खेलेगा भारत, तो खिलेगा भारत ” मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान आपण यंदा २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची ११५ वी जयंती साजरी करीत आहोत. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने हा दिवस “ राष्ट्रीय क्रीडा दिवस ” साजरा करण्याचे ठरविले आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक तसेच शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच आत्मविश्वास, निरोगी शरीर, एकाग्रता, कार्यकुशलता, सकारात्मकता, सहनशीलता, सहकार्य करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, खिलाडू वृत्ती, स्पर्धात्मक वृत्ती, नेतृत्त्व आदी सर्व गुणांचा विकास करण्यासाठी ‘खेळणे’ आवश्यक आहे. आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूपच कमी...

साप्ताहिक शिक्षक ध्येय १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा

  अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा   साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा  पालकांनो, ल ॉ कडाऊनच्या काळात तणावमुक्त राहा ...    कोरोनामुळे संपूर्ण जगभर ल ॉ कडाऊनची समस्या सुरू असताना याचा फायदा घेऊन संपूर्ण जगभर असलेल्या इंटरनेट नेटवर्कमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू झालेली आहे. प्रायव्हेट संस्था, शिकवणी घेणारे शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विविध पॅकेजेस आणत असताना खेड्यात राहणारा सर्वसामान्य पालक ज्याला दोन-चार अपत्ये आहेत. तो मात्र चिंताग्रस्त आहे. दररोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे कठीण झालेल्या पालकांमध्ये उदासीनता निर्माण होत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार वरचेवर वाढत असताना श्रीमंतांची मुले ऑनलाइन पॅकेजेसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु सर्वसामान्य कुटुंबात मात्र मुलगा आणि वडील किंवा मुलगी आणि वडील यांच्यात एकच मोबाईल आहे. त्या ठिकाणी मात्र तारेवरची कसरत होताना दिसत आहे. वडील कामानिमित्त बाहेर पडण्याच्या वेळेस ऑनलाईन क्लास सुरू होतो आहे. परं...