Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा

 

अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा  

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा 

पालकांनो, लकडाऊनच्या काळात तणावमुक्त राहा...

  कोरोनामुळे संपूर्ण जगभर लकडाऊनची समस्या सुरू असताना याचा फायदा घेऊन संपूर्ण जगभर असलेल्या इंटरनेट नेटवर्कमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू झालेली आहे. प्रायव्हेट संस्था, शिकवणी घेणारे शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विविध पॅकेजेस आणत असताना खेड्यात राहणारा सर्वसामान्य पालक ज्याला दोन-चार अपत्ये आहेत. तो मात्र चिंताग्रस्त आहे. दररोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे कठीण झालेल्या पालकांमध्ये उदासीनता निर्माण होत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार वरचेवर वाढत असताना श्रीमंतांची मुले ऑनलाइन पॅकेजेसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु सर्वसामान्य कुटुंबात मात्र मुलगा आणि वडील किंवा मुलगी आणि वडील यांच्यात एकच मोबाईल आहे. त्या ठिकाणी मात्र तारेवरची कसरत होताना दिसत आहे. वडील कामानिमित्त बाहेर पडण्याच्या वेळेस ऑनलाईन क्लास सुरू होतो आहे. परंतु पालकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. आपल्या पाल्यांना वेगवेगळी पाठ्यपुस्तके मिळालेली आहेत. त्याच पाठ्यपुस्तकांतून मुलांना अभ्यास करू द्यावा. शेजारचा विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करत आहे म्हणून आपले दैनंदिन गरजा भागवण्यापुरते भांडवल गुंतवून कौटुंबिक ताणतणाव निर्माण करून घेऊ नये. डेव्हिड स्किन हा प्रसिद्ध बालमानसशास्त्रज्ञ म्हणतो की, "कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी त्या कृतीत मुल दीर्घकाळ तन्मय होणे हे अतिशय आवश्यक आहे".

अँड्रॉइड मोबाईल नसणाऱ्या पालकांनी काय करावे हेच वाचा या अंकात...

 श्री रामकिशन द. गुद्दे, जि. प. उच्च प्राथ. शाळा,चुरमुरा, उमरखेड जि. यवतमाळ मोबा. ९६८९७०९६०४ यांचा लेख वाचा येत्या सोमवारच्या अंकात...

साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हाटसअॅप ग्रुपला जॉइन व्हा...*

https://tinyurl.com/yb7kv6sp

 दर्जेदार साहित्य: शिक्षक ध्येय

https://drive.google.com/file/d/1GzI8ONLqBtAhFYp3bmErX6N3tqfzDQAO/view?usp=drivesdk

Comments

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...