राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन
विजेत्यांना पारितोषिक,
बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल
शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला
स्पर्धा – २०२५’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना
चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश
आहे.
'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी
वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे.
राज्यातील
विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.
अ गट (इयत्ता पहिली
ते पाचवी)
ब गट (इयत्ता सहावी
ते दहावी)
क गट (इयत्ता अकरावी
ते पदवी)
विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला
म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या
कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह
त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
गट अ (इयत्ता पहिली
ते पाचवी) चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर
चित्र काढायचे आहे.)
1. फळ
2. फुल
3. झाड
४. घर
गट ब (इयत्ता सहावी
ते दहावी) चे विषय आहेत... (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. माझा आवडता सण
2. वृक्षारोपण
3. फुगेवाला
४. सहल
गट क (इयत्ता अकरावी
ते पदवी) चे विषय आहेत. (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
पोस्टर्स स्पर्धा
1. व्यसनमुक्ती
जनजागृती
2. प्लास्टिक मुक्त
जनजागृती
3. सडक सुरक्षा
जनजागृती
४. इंधन बचत जनजागृती
ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक
सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विद्यार्थ्यांसाठी
महत्त्वाची सूचना: आपल्या गटासाठी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयावर
चित्र काढायचे आहे. त्यासाठी प्रथम A4
आकाराचा कागद (झेरॉक्स काढतो तो कागद)
घ्यावा. A4 कागद उभा किंवा आडवा ठेऊन आपण चित्र काढू शकता. आपल्या गटासाठी
दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र त्या
कागदावर काढायचे आहे. चित्र काढून पूर्ण झाल्यावर त्या चित्रास सुबक रंग द्यायचा
आहे. रंग कोणत्याही प्रकारचे वापरु शकता. उदा. तेलकट खडू, स्केच पेन, जल रंग, अक्रालीक रंग, रंगीत पेन्सिल, तैल रंग इत्यादी जे
आपल्याकडे उपलब्ध आहे ते रंग वापरून चित्र छानपैकी स्वतः रंगवायचे आहेत.
चित्रास रंग देऊन झाल्यावर एक तासाने
त्या चित्राच्या कागदावर वरील उजव्या कोपऱ्यात (विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण
नाव, इयत्ता, गट अ, ब किंवा क)
विद्यार्थ्यांनी हे
चित्र स्वतः काढायचे आहे, यासाठी बहीण, भाऊ, आई, वडील किंवा मित्र यांची मदत घ्यायची नाही. त्यांचे कडून चित्र
काढून घ्यायचे नाही. तशी शंका आल्यास आम्ही व्हिडीओ कॉल करून लाईव्ह आपणास तेच
चित्र पुन्हा काढायला सांगू, त्यामुळे कुठलीही चिटिंग करु नये.
तो फोटो 9623237135 या WhatsApp नंबरवर
पाठवायचा आहे. चित्रकला स्पर्धासाठी फोटो च्या खालील मजकुरात विद्यार्थ्यांनी
स्वतःचे संपूर्ण नाव, विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो, इयत्ता, गट अ, ब किंवा क, शाळेचे पूर्ण नाव, शाळेचा पत्ता, दोन मोबाईल नंबर
(वडील आणि आईचा), व्हाट्सएप नंबर आणि त्याखाली वडिलांचे नाव, घरचा संपूर्ण पत्ता, लँड मार्क, मु. पो. तालुका.
जिल्हा, पिनकोड इत्यादी मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहावे. यासाठी
आपल्या चित्रकला शिक्षक, आई, वडील, मोठा भाऊ किंवा बहीण यांची मदत घ्यावी.
वरील सर्व माहिती व चित्राचा फोटो आपण
96 23 23 71 35 या व्हाटसएप नंबरवर पाठवायचा आहे.
रंगविलेले
चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
तीनही
गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि
प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) यांचा समावेश आहे.
चित्रकला स्पर्धेचा
निकाल दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी, बालदिनाच्या दिवशी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये तसेच
राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहीर
करण्यात येईल.
विजेत्यांचे चित्र, विजेत्यांचा फोटो, शाळेचे नाव व पत्ता
देखील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.
चित्रकला
स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क:
गट अ साठी 300 रुपये नोंदणी शुल्क
भरणे बंधनकारक आहे.
गट ब साठी 400 रुपये नोंदणी शुल्क
भरणे बंधनकारक आहे.
गट क साठी 500 रुपये नोंदणी शुल्क
भरणे बंधनकारक आहे.
4) नोंदणी शुल्क रक्कम फोन पे, गुगल पे, भीम द्वारे 9623237135 यावर
पाठवावे व त्याचा स्क्रिन शॉट पण 9623237135
याच व्हाट्सएप नंबरवरच पाठवावा.
महत्त्वाच्या सूचना:
1) या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते पदवीत शिकत असलेली मुले
व मुली सहभागी होऊ शकतात.
2) नोंदणी शुल्क भरले नाही तर चित्र विचारात घेतले जाणार नाही.
3) पाठविलेले चित्र विद्यार्थी /विद्यार्थिनी यांनी स्वतः काढलेले
व रंगविलेले असावे.
संशय आल्यास व्हिडीओ कॉल करून live पुन्हा
एकदा चित्र काढावे लागेल, सबब विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढणे अपेक्षित आहे.
5) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.
6) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
7) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय
असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
8) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.
9) स्पर्धेचा निकाल,
विजेत्यांचे फोटो, नाव व चित्रे न्यूज
पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे प्रसिद्ध केले जाईल.
11) दिनांक 31 ऑक्टोबर 2025 नंतर पाठविलेली चित्रे स्पर्धेसाठी विचारात घेतली
जाणार नाही.
12) नोंदणी शुल्क न भरलेली चित्रे
विचारात घेतली जाणार नाही.
राज्यातील मुख्याध्यापक
व चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्ग शिक्षक यांनी वर्गात सर्व
विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन
या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन 'शिक्षक ध्येय'च्या संपादकीय
मंडळातर्फे करण्यात आले आहे.
उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास आमच्या संपादकीय
मंडळातील आपल्या गावाच्या, जिल्ह्यातील संपादक,
प्रतिनिधी यांचेशी किंवा
9623237135 यावर संपर्क साधावा.
आपल्या ग्रुपला आताच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/GtSl1hZyVFk8qdz25ocGMJ
स्पॉन्सर, प्रायोजक पाहिजेत
राज्यस्तरीय ऑनलाईन बाल चित्रकला स्पर्धा
- 2025
स्पॉन्सर,
प्रायोजक
पाहिजेत
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपण "ना
नफा ना तोटा''
या
तत्त्वावर ऑनलाईन बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहेत... 14 नोव्हेंबर 2025
रोजी (बालदिनी) निकाल जाहीर करणार आहोत...
या
स्पर्धेसाठी आपण स्पॉन्सरशिप / प्रायोजकत्व घेऊन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना
वाव द्यावा...
स्पॉन्सरशीप
फी फक्त चार हजार रुपये असून.... यात
खालील फायदे मिळतील...
१) सर्व विजेत्या प्रमाणपत्र आणि ट्रॉफी वर स्पॉन्सरचे नाव व
लोगो प्रिंट करण्यात येईल..
२) स्पॉन्सरला देखील एक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल...
३) तसेच राज्यातील सर्व दैनिकातील बातमीत देखील ..... यांचे
संयुक्त विद्यमाने... म्हणून राज्यभर प्रसिध्दी देण्यात येईल..
४) तसेच त्यांची एक पूर्ण पान रंगीत जाहिरात 1 सप्टेंबर ते 14
नोव्हेंबर 2025 पर्यंत शिक्षक ध्येय च्या प्रत्येक अंकात मोफत प्रसिद्ध केली
जाईल..
ही रक्कम आपण ट्रॉफी, प्रमाणपत्र, कुरिअर खर्चासाठी वापरणार आहोत... जास्तीत जास्त मुलांना पारितोषिक देण्याचा आपला प्रयत्न असतो...
शैक्षणिक
संस्था,
चित्रकला
क्लासेस,
चित्रकला
साहित्य तयार करणाऱ्या कंपन्या, camel, नवनीत इत्यादी, NGO, दानशूर व्यक्ती, एखादी कंपनी, कोणतीही शाळा, महाविद्यालय, ITI, बिल्डर्स, एखादी असोसिएशन, दैनिक वर्तमानपत्र, मासिक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, दुकानदार, मेडिकल, शिक्षक, शिक्षक संघटना
इत्यादी स्पॉन्सरशिप घेऊ शकतात...
इच्छुक असल्यास 9623237135
या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी संपर्क साधावा...
संपादकीय
मंडळ,
साप्ताहिक
शिक्षक ध्येय,
महाराष्ट्र
