राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६
राज्यातील महिलांसाठी
कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन
८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर
शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, प्रायोजक – १, प्रायोजक – २, प्रायोजक – ३, पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी 'कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.
'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत.
महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर
सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
1) उपक्रमाचे शीर्षक
2) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा
3) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती
4) उपक्रम स्वतः राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र
5) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे
6) पीडीएफला स्वत:चे नाव द्यावे.
7) आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि मोबाईल आणि व्हाट्सऍप नंबर प्रस्तावात शेवटी लिहावा.
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा ३००० शब्द असून जास्तीत जास्त निवडक १० फोटोचा वापर करावा. अहवाल १० एम बी पर्यंत पीडीएफ स्वरूपात तयार करून पाठवायचा आहे.
महिलांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल/प्रस्ताव बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत MS Word मध्ये टाईप करुन नंतर त्याची pdf (पीडीएफ) तयार करून पाठवावी.
सदर उपक्रम हा यापूर्वी स्वत: राबविलेला असावा.
उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे.
विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी), सन्मानपत्र (प्रिंट प्रमाणपत्र) देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क आहे
एका प्रस्तावासाठी रु. 550 (पाचशे पन्नास रुपये) नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.
आपला अहवाल प्रस्ताव पीडीएफ सादर करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२६ आहे.
प्रस्तावाची पीडीएफ 9623237135 या व्हाटसअॅप नंबरवर पाठवावी.
नोंदणी शुल्क भरण्यासाठी भीम / फोन पे/G पे नंबर 9623237135 हा आहे.
9623237135 याच मोबाईल नंबरवर शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.
महत्त्वाच्या सूचना:
१) या स्पर्धेसाठी सर्व क्षेत्रातील महिला सहभागी होण्यास पात्र आहे.
२) या स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ती महिला, डॉक्टर, वकील, शिक्षिका, राजकारणातील महिला, गृहिणी, सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणारी महिला सहभागी होऊ शकतात.
4) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विजेत्यांचे फोटो, नाव, व मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.
5) नोंदणी शुल्क न भरलेले अहवाल विचारात घेतले जाणार नाही.
6) आपण आपले अहवाल प्रस्ताव पीडीएफ आणि नोंदणी शुल्क 550 रुपये आमचे संपादकीय मंडळातील उपसंपादक , उपसंपादिका किंवा प्रतिनिधी यांचे कडेही पाठवू शकता..
संपर्क : मधुकर घायदार 9623237135
