Skip to main content

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

 

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ 

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.  



'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.  पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  आणि सहाव्या वर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी ५० विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत सहा वर्षात राज्यातील एकूण २६५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सातवे वर्ष आहे.

              राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.




राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.


राज्यातील शिक्षकांमधून  दोन  गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

A)          प्राथमिक गट

 (अंगणवाडी ते सातवी)

B)           माध्यमिक   उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)

              राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या  सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

              पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा  या स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.



       उपक्रम अहवाल लेखनात  खालील मुद्दे समाविष्ट असावेत.

1) उपक्रमाचे शीर्षक

2) उपक्रमाची गरज व महत्त्व

3)  उद्दिष्टे

4)  नियोजन

5)  यशस्वीता /निष्कर्ष

6)  समारोप /फायदे

7) परिशिष्टे

8) उपक्रमाची सद्यस्थिती

9) पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे.

 उदा. सुनील पाटील गट  A 

10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. प्रमाणपत्राच्या नमूनासाठी

CLICK HERE

या मुद्द्यांचा समावेश असावा.

शब्दमर्यादा  3000  शब्द असून जास्तीत जास्त  10  फोटोचा वापर करावा. अहवाल  10  एम बी पर्यंत  (जास्त नको)  पीडीएफ स्वरूपात तयार करून  फक्त 9623237135 याच  व्हाट्सअॅप नंबरवर पाठवायचा आहे.  (इतर नंबरवर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)

              शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत  एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ ( .pdf)  करून पाठवावी.  उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा व दुसऱ्या ठिकाणी (उदा. पुणे, सोलापूर) स्पर्धेत पाठविलेला नसावा.

 

उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख ० ऑगस्ट २०२६ आहे. मुदत वाढविली जाणार नाही.

 

 9623237135  या व्हॉट्सॲप नंबरवर उपक्रम अहवाल पीडीएफ पाठवावी.

खाली चार नमुना उपक्रम अहवाल दिलेले आहेत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

 

 1.      CLICK HERE

2.     CLICK HERE 

3.     CLICK HERE 

4.     CLICK HERE 

 

विजेत्या  उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी,  प्रिंट  प्रमाणपत्र  देण्यात येईल तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र  आणि शिक्षक ध्येयचे ५१+ डिजिटल अंक आणि ५१+ बेस्ट नावीन्यपूर्ण उपक्रम अहवाल पीडीएफ  व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.

 

या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क आहे..  

 

नोंदणी शुल्क 599 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे 

96 23 23 71 35  या नंबरवर पाठवावे.

 

पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट

उपक्रम अहवाल pdf च्या खाली 9623237135 याच नंबरवर पाठवावा.

 

स्पर्धेचा निकाल दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘शिक्षक दिनी’ राज्यातील विविध वर्तमानपत्रात आणि साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये राज्यस्तरावर जाहीर करण्यात येईल.

राज्यातील उपक्रमशील शिक्षक व  शिक्षिका यांनी  या स्पर्धेत  सहभाग  नोंदवावा, असे आवाहन साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई; यशिता गार्डन नर्सरी, वर्धा  आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड तसेच  शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे.

 

असा असावा उपक्रम अहवाल :

1) उपक्रम  एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करुन त्याची pdf करुन पाठवावी.

2) एका शिक्षकांस एकच उपक्रम पाठविता येतील.

3)  शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही.  पीडीएफ 10 MB  च्या आत असावी.

5) अंतिम मुदत   २०    ऑगस्ट २०२६ असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.

6)  पूर्वी पुरस्कार मिळाला असला तरी यंदा पुन्हा सहभागी होऊ शकता (वेगळा उपक्रमसह) तसेच संपादकीय मंडळातील शिक्षकशिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता.

7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा  कारण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

8) निकालानंतर वाद घालू नये. 9) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास  9623237135 या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी  संपर्क करावा.

10) सर्वात महत्त्वाचे: शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, गट  A  किंवा  B, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर इ. तपशील 9623237135 या नंबरला उपक्रम पी डी एफ च्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा.

स्क्रीन शॉट न पाठविलेले उपक्रम विचारात घेतले जाणार नाही.

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

 

शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादकप्रतिनिधी   यांचे कडेही आपण प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता..




Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz