Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

पेपर फुटल्यामुळे आज होणारी TET परीक्षा रद्द

  पेपर फुटल्यामुळे आज होणारी TET परीक्षा रद्द महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये पेपरफुटी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून, पुढील परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. खालील व्हिडिओ बघा.. येथे क्लिक करा  https://youtu.be/tspfywuoLvk?si=EOr5scSZuBukwCVy

पर्यावरण दिन विशेषांक

  संपादकीय...   आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे पण शाश्वत बदल करणे गरजेचे..   दरवर्षी ५ जून उजाडला की , जगभरात एकच लगबग सुरू होते. ' जागतिक पर्यावरण दिन ' साजरा करण्यासाठी शाळेपासून मंत्रालयपर्यंत भाषणे, चर्चासत्रे , वृक्षारोपण दिखाव्याचे कार्यक्रम , चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, घोषणाबाजी आणि झाडे लावा, झाडे लावा या सर्व गोंधळात त्या झाडांचा जीव गुदमरून दुसऱ्या - तिसऱ्याच दिवशी ते झाड मरून जाते. सोशल मीडियावर झाडे लावतांनाचे हिरवेगार फोटो आणि पर्यावरणाचे संदेश स्टेटस म्हणून झळकू लागतात. पण , ६ जून उजाडताच पुन्हा तीच जुनी प्रथा सुरू होते, प्लॅस्टिकचा बेसुमार वापर , कर्कश आवाज, पाण्याचा अपव्यय , कचऱ्याचे ढीग आणि नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नालीचे पाणी नदीत सोडणे आणि एकंदरीत निसर्गाकडे आपण दुर्लक्ष करतो. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , जिथे पर्यावरण रक्षण हा केवळ एका दिवसाचा भाषणाचा उत्सव किंवा केवळ निबंध लिहिण्याचा विषय राहिलेला नाही. ती आज या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची ' करो या मरो ' अशी परिस्थिती बनली आहे. आज एकविसावे शतक विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञा...