Skip to main content

पर्यावरण दिन विशेषांक

 



संपादकीय...

 

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे पण शाश्वत बदल करणे गरजेचे..

 

दरवर्षी ५ जून उजाडला की, जगभरात एकच लगबग सुरू होते. 'जागतिक पर्यावरण दिन'साजरा करण्यासाठी शाळेपासून मंत्रालयपर्यंत भाषणे, चर्चासत्रे, वृक्षारोपण दिखाव्याचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, घोषणाबाजी आणि झाडे लावा, झाडे लावा या सर्व गोंधळात त्या झाडांचा जीव गुदमरून दुसऱ्या - तिसऱ्याच दिवशी ते झाड मरून जाते. सोशल मीडियावर झाडे लावतांनाचे हिरवेगार फोटो आणि पर्यावरणाचे संदेश स्टेटस म्हणून झळकू लागतात. पण, ६ जून उजाडताच पुन्हा तीच जुनी प्रथा सुरू होते, प्लॅस्टिकचा बेसुमार वापर, कर्कश आवाज, पाण्याचा अपव्यय, कचऱ्याचे ढीग आणि नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नालीचे पाणी नदीत सोडणे आणि एकंदरीत निसर्गाकडे आपण दुर्लक्ष करतो. आज आपण अशा वळणावर उभे आहोत, जिथे पर्यावरण रक्षण हा केवळ एका दिवसाचा भाषणाचा उत्सव किंवा केवळ निबंध लिहिण्याचा विषय राहिलेला नाही. ती आज या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची 'करो या मरो' अशी परिस्थिती बनली आहे.

आज एकविसावे शतक विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगाने पुढे जात आहे. परंतु, या प्रगतीच्या शर्यतीत आपण निसर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. जागतिक तापमानवाढ, ऋतूचक्रातील अनपेक्षित बदल, हवेचे-पाण्याचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिक प्रदूषण आणि ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग या सर्व गोष्टी आता थांबवल्या पाहिजे. हे सर्व थांबवण्यासाठी केवळ सरकारने कायदे करुन उपयोग होणार नाही तर प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याप्रती सुजाण, सजग, सुसंस्कृत बनणे गरजेचे झाले आहे. मानवी मानसिकतेत बदल घडवणे आवश्यक आहे. या बदलाची सुरुवात शाळांमधूनच होऊ शकते आणि या 'पर्यावरण क्रांती'चे खरे सारथी आपल्या देशातील शिक्षकच आहे.

केवळ पुस्तकी अभ्यासक्रमात 'पर्यावरण' विषय ठेवून ही क्रांती होणार नाही. केवळ 'पर्यावरण अभ्यास' या विषयाचे धडे वर्गात वाचून दाखवण्यापेक्षा, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवू शकतात. त्यासाठी शिक्षकांनी कृतियुक्त प्रशिक्षण देणे आता गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वर्गाच्या चार भिंतींच्या बाहेर नेऊन निसर्ग समजावून सांगणे आवश्यक आहे.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मोठ्या घोषणा करण्यापेक्षा, आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे पण शाश्वत बदल करणे गरजेचे आहे. हाच या विशेषांकाचा मुख्य उद्देश आहे.

निसर्गाचे रक्षण, हाच आपला खरा विकास!

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!


खालील लिंकवर क्लिक करा..


https://chat.whatsapp.com/DilsYhuRDjS4VNhKvtbX3L?mlu=0&s=cl&p=a


Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...