संपादकीय... विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण शाळेतच मिळाले पाहिजे पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. प्रयोगातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते तसेच यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यातील जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. यातूनच नवीन कल्पक, उद्योजक, कलाकार घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण व सर्जनशीलतेला वाव मिळतो. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल? शाळेतील कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय शिक्षण हे खरे तर विद्यार्थ्यांमधील कलाकाराला साद घालणारे विषय आहेत. हे सर्व विषय व्यवस्थित शिकविले गेल्यास अनेक उद्योजक, कलाकार तयार होतील पण खरच आजकाल हे विषय शाळेत प्रभावीपणे शिकविले जातात का? शाळा ही फक्त परीक्षार्थी बनवायची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम ती करीत असते. आजही विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव आदी तास आवडतात पण दुर्दैव असे की एकतर या विषयांना शिक्षकच नसतात त्यामुळे या तासांना गणित, इं...
कौशल भारत - कुशल भारत