Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 25 मे 2026

 



संपादकीय...

 

विद्यार्थ्यांना कौशल्य शिकण्याची संधी शाळेतच मिळाली पाहिजे  

 

भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी नेमण्यास उपयुक्त नाही.” असे खळबळजनक पण धक्कादायक वाटणारे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी केले. आज देशातील ५० हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या आवश्यक कुशल मनुष्यबळाअभावी पडून असल्याचा अहवाल एका अर्थविषयक मासिकाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

ब्रिटीश शिक्षण पद्धतीमध्ये फक्त भाषा (इंग्रजी) आणि शास्त्र याविषयांवर भर होता. हळूहळू कौशल्य विकास शिक्षणातून लुप्त होत गेला. गेल्या पन्नास वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानही वरवर दिले जाते. पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही सखोल नसते आणि काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. कमालीच्या पुस्तकी, साचेबंद, बदललेल्या मार्केट किंवा परिस्थितीच्या गरजांपासून आणि तरीही दिवसेंदिवस खर्चिक बनत चाललेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे पुस्तकी आणि ‘घोकलेल्या’ माहितीपलीकडे न जाऊ शकणारे आणि मुलभूत कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ आपली शिक्षणव्यवस्था ‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे. बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये ज्यांचा उपयोग काडीमात्र नाही.

भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. कौशल्य शिक्षण हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. विद्यार्थ्यांच्या अंगात अनेक अनमोल गुण असतात. सर्वप्रथम स्व:ची ओळख करून घ्या. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखणे व त्यात करिअर करणे.

आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच आहे. भारतात आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कौशल्य शिकण्याची संधी शाळेतच मिळाली पाहिजे.

भारतात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था आयटीआय, तंत्रनिकेतन, अभियंता कॉलेजची स्थिति फारशी समाधानकारक नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी कच्चा माल आणि पुरेशी मशीनरी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे पण प्रत्यक्षात असे घडते का? याचा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करण्याची वेळ आता आली आहे.


करिअर विशेषांक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..


इथे क्लिक करा.. Click Here 



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz