Skip to main content

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

 


अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा  

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

खेलेगा भारत, तो खिलेगा भारत

मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपण यंदा २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची ११५ वी जयंती साजरी करीत आहोत. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.

व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक तसेच शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच आत्मविश्वास, निरोगी शरीर, एकाग्रता, कार्यकुशलता, सकारात्मकता, सहनशीलता, सहकार्य करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, खिलाडू वृत्ती, स्पर्धात्मक वृत्ती, नेतृत्त्व आदी सर्व गुणांचा विकास करण्यासाठी ‘खेळणे’ आवश्यक आहे.

आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूपच कमी महत्त्व दिले जाते. परिणामी लोकसंख्येचा विचार करता ऑलम्पिक स्पर्धेत पारितोषिके मिळविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. आपल्या एखाद्या राज्यापेक्षाही लहान असणारे देश अनेक सुवर्णपदके पटकावितात, असे का होते?

कोणत्याही खेळात नैपुण्य संपादन करावयाचे असल्यास योग्य सराव, चिकाटी, इच्छाशक्ती, परिश्रम, मार्गदर्शन, संतुलित आहार, सकारात्मक दृष्टीकोन, व्यायाम, पाठिंबा, आवश्यक साहित्य व साधने, मैदानाची उपलब्धता, पुरेसे आर्थिक पाठबळ आदींची आवश्यकता असते.

केवळ खेळावर उपजीविका करता येत नाही हा एक गैरसमज आपल्यात आहे, म्हणून नोकरी करून उरलेल्या वेळात खेळाचा सराव करत पारितोषिकांची प्राप्ती कशी होणार? आपल्या मनात असलेली खेळाविषयी ‘नकारात्मक मानसिकता’ या अपयशाला कारणीभूत ठरत आहे. यात केवळ सरकारवर संपूर्ण अवलंबून राहणे योग्य नाही.

मुकाट्याने शाळा शिक आणि नोकरी कर ऐवजी मुकाट्याने खेळायला जा आणि प्राविण्य मिळव असे म्हणायची आज वेळ आलेली आहे, असे आपणास वाटते का?

साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हाटसअॅप ग्रुपला जॉइन व्हा...*

https://tinyurl.com/yb7kv6sp   

 

खालील लिंकवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून आपण अंक वाचू शकता....

 


Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...