Skip to main content

शिक्षक ध्येय १ ऑगस्ट २०२२ : राहा नेहमी सकारात्मक...

 



शिक्षक ध्येय १ ऑगस्ट २०२२ : राहा नेहमी सकारात्मक... 

संपादकीय...

स्वतःवर ताबा ठेवा - बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की काहीही नकारात्मक विचार करणार नाही, परंतु आपल्या अवती भोवती घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम करून मनस्ताप करून घेतो. असं होऊ नये या साठी आपल्याला स्वतःवर ताबा ठेवणे महत्वाचे आहे.

 

ध्यान करा - आपल्या मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान सर्वोत्तम मानले आहे. मन शांत असेल तर एकाग्रतेमुळे सकारात्मक विचार येतात. ध्यान केल्याने ऊर्जा मिळते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. या मुळे माणूस कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम होतो. 

 

सकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी भेटा -प्रत्येकामध्ये वैचारिक मतभेद असतातच. काही लोक सकारात्मक विचारांचे असतात ,तर काही लोक नकारात्मक विचारसरणीचे असतात. नेहमी आपण सकारात्मक विचार असणाऱ्याशी भेटावे. जेणे करून त्यांचे सकारात्मक विचार आपल्याला पुढे वाढण्यासाठी प्रवृत्त करतील. म्हणून नेहमी सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या संपर्कात राहावे.  

 

आपल्या लक्ष्यावर स्थिर राहा - आपले ध्येय किंवा लक्ष्य आपल्या आवडीनुसार असावे. जेणे करून त्या लक्ष्य प्राप्तीसाठी आपण सकारात्मक विचार करून त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कराल. या मुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि आपण प्रत्येक परिस्थितीशी लढा देण्यात सक्षम व्हाल.

 

आपल्या मानसिक संरचनेत बदल करा - कोणत्या परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय आहे हे आपल्या वैचारिक सामर्थ्यावर अवलंबून आहे. आपण परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने विचार केला तर ती समस्या लहान होईल आणि आपण त्यावर योग्य निर्णय घेऊ शकाल. नकारात्मक विचार करून आपण समोर आलेल्या समस्येला जास्त मोठी बनवतो. आपल्याला मानसिक विचारांना बदल करायला पाहिजे. 

 

सकारात्मक आणि प्रेरक विचार वाचा - असं म्हणतात की आपल्या सभोवताली जसे वातावरण असेल आपले विचार देखील तसेच होतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार असलेल्या गोष्टी वाचाव्या. या मुळे आपल्याला प्रेरणा मिळते. आणि आपले विचार देखील सकारात्मक बनतात कोणतेही काम करायला आत्मविश्वास वाढतो आणि काम यशस्वी होतात. म्हणून नेहमी विचारांना सकारात्मक बनविणारे पुस्तक वाचावे.

अंक वाचण्यासाठी वरील मुखपृष्ठावर -पुस्तकाच्या कव्हर वर - क्लिक  - स्पर्श  - करावा.... धन्यवाद 

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...