आदिवासी विकास विभाग औरंगाबाद
शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश
पात्रता: तालुकास्तरावर 8 वी उत्तीर्ण आणि जिल्हास्तरावर 10 वी उत्तीर्ण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी...
समावेश: औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी
एकूण वसतिगृह: 14
पात्र विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करून, कागदपत्रासह खालील फोन नंबरवर संपर्क करावा...
संकेतस्थळासाठी... CLICK HERE
फोन नंबर: 0240-2486069
अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना
वसतिगृहात मोफत प्रवेश
(सुधाकर जाधव, अतिथी संपादक, शिक्षक ध्येय औरंगाबाद) :
औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्ह्यातील एकूण चौदा वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या वसतीगृहात मोफत प्रवेश देणे आहे.
तरी पात्र विद्यार्थी यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले.
तालुकास्तरावर आठवीपासून पुढील प्रवेशाकरिता तसेच जिल्हास्तरावर अकरावीपासून पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येतो. वसतिगृह प्रवेशासाठी वरील संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. पालकाचे घोषणापत्र, विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज इतर माहितीसाठी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.