शिक्षक ध्येय २५ जुलै २०२२ - स्पर्धा विशेषांक

 



संपादकीय...

 

 

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

         

“मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही...”

-   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या जोरावर टिळकांनी राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सांगून तो कृतीत आणला.

विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांनी 1 जानेवारी 1880  रोजी 'न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. 1884 मध्ये त्यांनी आगरकरांसोबत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली.
याच संस्थेमार्फत 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
यात ते गणित आणि संस्कृत विषय शिकवित.

जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी 1881 साली मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' हे वृत्तपत्रे सुरु केली. 1882 साली भारतातील सर्वाधिक खप असलेले 'केसरी' हे वर्तमानपत्र होते. त्यातील टिळकांचे 'अग्रलेख' हा केसरीचा आत्मा होता. 1881 ते 1920 या काळात त्यांनी 514 झणझणीत अग्रलेख लिहले. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा खणखणीत अग्रलेख लिहिण्याचे धाडस केले ते टिळकांनीच.

गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव याद्वारे त्यांनी लोकांना संघटित केले.

तन, मन आणि धन अर्पण करून या थोर 'शिक्षका'ने देशसेवा केली.

1 ऑगस्ट 1920 पर्यंत आपल्या प्रत्येक कृतीतून अंतिम श्वासापर्यंत देशसेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या 'ध्येयवादी' थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन!

अंक वाचण्यासाठी वरील मुखपृष्ठावर - COVER PHOTO - वर क्लिक, स्पर्श करावा..

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग