Skip to main content

Posts

साप्ताहिक शिक्षक ध्येय १९ जून २०२३

  साप्ताहिक शिक्षक ध्येय  जागतिक योग दिन विशेषांक (प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, कथा, लेख, विनोद, नोकरीच्या जाहिराती, भारत सरकारने प्रकाशित केलेली जागतिक योग दिन पुस्तिका (पाने ५०) मार्गदर्शक पुस्तिका, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक) वर्ष ४ थे; अंक १० वा; सोमवार, दिनांक १९ जून २०२३ जागतिक योग दिन विशेषांक रोखठोक मध्ये वाचा: मला अभिप्रेत असणारा शिक्षक: कुमार नवनीत नाकडे, कुथे पाटील कॉन्व्हेन्ट, वडसा, जिल्हा गडचिरोली. आजच्या अंकातील  ' शादी में जरुर आना' हा हिंदी चित्रपट नक्की बघा.  विशेष आकर्षण:  पुस्तिका : भारत सरकारने प्रकाशित केलेली जागतिक योग दिन पुस्तिका, एकूण पाने 50. नक्की वाचा. ★ संपादकीय: रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस मिळवा... ★ स्पर्धेची संपूर्ण माहिती व मुखपृष्ठावर झळकण्याची संधी... ★ झाडे लावतानाचे फोटो ★ पेरते व्हा: भानुदास पाटील, रायगड. ★ बदलतं काश्मीर, बहरतं काश्मीर: प्रमोद पाटील, पालघर. ★ मँट चटई पलीकडे योग: एक उत्सव सक्ती नाही: श्रीमती शुभांगी नेने, नाशिक. ★ गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन: प्रा. सुहास पटवर्धन,...

माझे आयडॉल माझे बाबा

  माझे आयडॉल माझे बाबा       "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या        का गं गंगा यमुनाही या मिळाल्या"                  रेडिओवर कवी बी उर्फ मुरलीधर गुप्ते यांनी लिहिलेले गाणे चालू होते. रडणाऱ्या मुलीचे बाबा आपल्या चिमुरडीला रडण्याचे कारण विचारत होते. तिची समजूत घालत होते. मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून ते व्याकूळ झाले होते. जसे पिल्लू आपल्या आईच्या पंखाखाली सुरक्षितपणे विसावते तसे मी माझ्या बाबांच्या छत्रछायेखाली सुखात होते. माझे बाबा खूप शिकलेले किंवा फार मोठ्या पदावर नोकरीला नव्हते पण आम्हाला सुखी करण्यासाठी अहोरात्र झटत असायचे. आमच्या सर्व गरजा पूर्ण करून ते आमच्या शिक्षणाला संपूर्ण पाठिंबा देत.               माझे बाबा एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. आम्हा भावंडांना त्यांचा धाक असला तरी आमच्या अभ्यासाकडे आणि वर्तनाकडे त्यांचे नियमित लक्ष असायचे. ते आमच्याशी खेळकरपणे वागत पण आमचे काही चुकले तर वेळीच जाणीव करून देत. त्यांना फावला वेळ मिळाला की ते आम्हाला गणितातील कोडी...

समान नागरी कायदा: आपले मत मांडा

  समान नागरी कायदा: आपले मत काय? 30 दिवसात केंद्र सरकारला कळवा.. लिंक जारी.. केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशातील नागरिकांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक जारी करण्यात आली आहे. या लिंकवर नागरिकांनी आपली मते मांडायची आहेत. आपली मते पुढील 30 दिवसांमध्ये.. खालील लिंकवर क्लिक करा.... https://legalaffairs.gov.in/law_commission/ucc/   या लिंकवर जाऊन नोंदवायची आहेत. यासाठी 2MB पर्यंतच्या PDF फाईल मध्ये आपली मते नोंदवून लिंकवर अपलोड करु शकता किंवा 3,000 शब्दांत लिंकवर आपली मते टाईप करुन नोंदवता येणार आहेत.  समान नागरी कायदा म्हणजे काय? समान नागरी कायद्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची वेळ आलीय. यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील. कुणी हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन नाही.  समान नागरी कायदा म्हणजेच यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष ...

जगातील सर्वोत्तम १० शाळांची यादी जाहीर: महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश

  महाराष्ट्राचा अभिमानक्षण...   आज महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र अभिमानास्पद क्षण अनुभवत आहे.  ब्रिटनमधील 'टी ४' एज्युकेशन संस्था 'वर्ल्ड बेस्ट स्कूल' ही स्पर्धा भरवत असून या स्पर्धेत जगभरातील अनेक शाळा सहभागी होतात. या स्पर्धेतून संपूर्ण जगातील सर्वोत्तम १० शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश आहे.     नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व शाळांचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया राबवत आहे. या पार्श्वभूमीवर या शाळांचा जागतिक पातळीवर सन्मान होणे, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. या शाळांचे आणि संस्थाचालकांचे हार्दिक अभिनंदन... जाणून घ्या... या तीन शाळा कोणत्या आहेत? ...  Join WhatsApp Group https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  Download now.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Engg. Diploma च्या Direct दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्या...

  Engg. Diploma च्या Direct दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्या... 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असाल तर Diploma च्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश इयत्ता बारावी नंतर किंवा आय टी आय उत्तीर्ण असाल तर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता. प्रवेश फेरी मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2023 आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा पदविका म्हणजेच पॉलीटेक्निक तथा तंत्रनिकेतन ला इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यास पहिल्या वर्षाला प्रवेश दिला जातो. पण बारावीत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक यांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण असावा किंवा दोन वर्षाचा कोणताही अभ्यासक्रम (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) आय टी आय उत्तीर्ण असावा. म्हणजेच 12 वी सायन्स किंवा दोन वर्षाचा कोणताही आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी इंजिनिअरिंग पदविकाच्या (डिप्लोमा) थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी पात्र आहेत... WhatsApp Group https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D शैक्षणिक माहितीसाठी... https://play.google.co...

ITI प्रवेशाला: आजपासून सुरुवात

  ITI प्रवेशाला: आजपासून सुरुवात ऑगस्ट २०२३ सत्रासाठी वेळापत्रक जाहीर  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) आजपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी जर इयत्ता दहावी पास/नापास असेल तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो. आयटीआय मध्ये एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.. ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक आज १२ जून ते ११ जुलै. २०२३ संपूर्ण वेळापत्रक, अर्ज करण्याची पद्धत, प्रवेश अर्ज शुल्क, अर्ज स्वीकृती केंद्र, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध, पहिली प्रवेश फेरी, दुसरी, तिसरी, चौथी प्रवेश फेरी तसेच सविस्तर वेळापत्रक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE आमचा व्हॉट्सॲप ग्रुप.. https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय 12 जून 2023

  संपादकीय... रोपट लावा , फोटो काढा आणि बक्षीस मिळवा... प्रत्येक क्षणाच्या श्वासासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. कोविड रुग्णाची ऑक्सीजन लेवल ९५ च्या खाली गेल्यानंतर रुग्णांची व नातेवाईकांची कशी तारांबळ होते , याचा प्रत्यय सदोदित येत होता परंतु मानव अजूनही शहाणा झाला नाही. प्राणवायू साठी वृक्ष लागवड व वृक्षांची निगा किती महत्वाची आहे , हे स्वार्थी मनुष्याला कधी कळलेच नाही. भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर आता तरी ' एक झाड लावा ' अशी आर्त साद  घालण्याची वेळ आली आहे. आता तरी बेसावध असणाऱ्यांनो सावध व्हा. वृक्ष लागवड करा , अशी म्हणण्याची परत एकदा वेळ आली आहे.             दरवर्षी जून महिन्यात आपण ५ जूनला ' पर्यावरण दिन ' साजरा करतो. केवळ दिन साजरा करून पर्यावरण सुरक्षित राहणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज आली आहे.         चला तर.. यावर्षी आपण प्रत्यक्ष वृक्ष लागवड करून त्याची निगा राखू या..व पर्यावरण सुरक्षित राखु या ...

WhatsApp: नवीन फीचर लॉन्च

  WhatsApp: नवीन फीचर लॉन्च  जे व्हॉट्सॲपवर चुकीचे मेसेज टाईप करून पाठवतात त्यांच्यासाठी... हे नवीन खास फीचर अशा लोकांसाठी आहे जे व्हॉट्सॲपवर चुकीचे मेसेज टाईप करून पाठवतात. आता असे मेसेज डिलीट करण्याऐवजी ते दुरुस्त करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम Google Play Store वर जाऊन आपले WhatsApp Update करून घ्यावे. जाणून घेऊ या.. नवीन व्हॉट्सॲपचे एडिट फीचर कसे कार्य करते? आपण कसे वापरावे?  व्हॉट्सॲपवर चुकीचा मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत तुम्ही तो एडिट करू शकाल. यानंतर मेसेज एडिट करता येणार नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला तो चुकीचा संदेश डिलीटच करावा लागेल. असा करावा मेसेज एडिट.. मेसेज टाईप केला आणि पाठविला असता लक्षात आले की, यात अमुक एक शब्द वा वाक्य चुकीचे आहे.. अशा वेळी पाठविलेला मेसेज बोटाने दाबून ठेवावा.. सिलेक्ट करावा... उजवीकडील तीन टिंबवर क्लिक करावे .. त्यात edit option दिसेल.. त्यावर क्लिक करावे... व मेसेज edit करून पुन्हा send करावा... लक्षात ठेवा पाठविलेला मेसेज आपण फक्त १५ मिनिटेच edit करु शकतो... पंधरा मिनिटे झाल्यानंतर नाही edit करु शकणार... h...

मोबाईलवर Chat GPT कसे वापरावे?

  मोबाईलवर Chat GPT कसे वापरावे ?                      सध्या Chat GPT नाव सारखे ऐकण्यात येत आहे. अतिशय वेगाने जबरदस्त क्रांती घडवून आणलेली आहे , याचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे. चॅट जीपीटी याच्या नावातच चॅट हा शब्द आहे म्हणजे यामध्ये चॅटिंग करता येते व आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI) चे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला गुगल असिस्टंट माहित आहे ते देखील आपल्याला मदत करते तसेच Chat GPT काम करते.पण फक्त लिखित स्वरूपातच उत्तर देते Chat GPT अर्थात Chat Generative Pre-trained Transformer. Generative : निर्माण करतो Pre-trained : पूर्व प्रशिक्षित Transformer : दिलेला मजकूर समजून घेणारे लर्निंग मॉडेल        याला आपण आपले प्रश्न विचारू शकतो व ते आपल्याला त्याची अचूक आणि स्पष्ट उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. Google वर जर आपण एखादा प्रश्न विचारला तर तेथे आपल्याला थेट उत्तर मिळत नाही तर आपल्याला Google काही वेबसाइट्स , ब्लॉगस्पॉ...