समान नागरी कायदा: आपले मत काय?
30 दिवसात केंद्र सरकारला कळवा.. लिंक जारी..
केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशातील नागरिकांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक जारी करण्यात आली आहे. या लिंकवर नागरिकांनी आपली मते मांडायची आहेत.
आपली मते पुढील 30 दिवसांमध्ये..
खालील लिंकवर क्लिक करा....
https://legalaffairs.gov.in/law_commission/ucc/
या लिंकवर जाऊन नोंदवायची आहेत. यासाठी 2MB पर्यंतच्या PDF फाईल मध्ये आपली मते नोंदवून लिंकवर अपलोड करु शकता किंवा 3,000 शब्दांत लिंकवर आपली मते टाईप करुन नोंदवता येणार आहेत.
समान नागरी कायदा म्हणजे काय?
समान नागरी कायद्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची वेळ आलीय. यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील. कुणी हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन नाही.
समान नागरी कायदा म्हणजेच यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच, जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल.
WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/DilsYhuRDjS4VNhKvtbX3L
शिक्षक ध्येय: एकमेव निःपक्ष साप्ताहिक
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwn
