राज्यातील ४७ विद्यार्थ्यांना बालदिनी
‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर
शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
अ, ब आणि क गटातील
एकूण ४७ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह
आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे.
तसेच या स्पर्धेतील
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
या
स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, 'शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक
विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा,
आसबेवाडी (मारापूर), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पारितोषिक
विजेते विद्यार्थ्यांचे रोटरी क्लब ऑफ यवतमाळ
आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक तसेच शिक्षक ध्येयचे संपूर्ण
संपादक मंडळाने अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
विजेत्यांमध्ये अ गटात ....
विजेत्यांची यादी वाचण्यासाठी....
आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा..