Skip to main content

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

 




राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल

शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२३साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ना नफा ना तोटाया तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.


  

'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)

ब गट (इयत्ता सहावी ते दहावी) 

क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) 

        विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

        ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी

https://shikshakdhyey.co.in

 

https://www.shikshakdhey.in

 

या संकेतस्थळांना भेट द्यावी. 

 

गट अ चे विषय आहेत…  (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. पतंग

2. फुलपाखरू

3. फुगा

४. फुलदाणी  

 

गट ब चे विषय आहेत... (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. माझा आवडता पक्षी

2. माझी शाळा

3. निसर्ग चित्र

४. परी

 

गट क चे विषय आहेत... (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)

1. माझा आवडता प्राणी

2. झेंडा वंदन

3. गावची जत्रा

४. माझा आवडता सण  

 


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: आपल्या गटासाठी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे. त्यासाठी प्रथम A4 आकाराचा कागद (झेरॉक्स काढतो तो कागद) घ्यावा. A4 कागद उभा किंवा आडवा ठेऊन आपण चित्र काढू शकता. आपल्या गटासाठी दिलेल्या चार विषयांपैकी फक्त एकाच विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र त्या कागदावर काढायचे आहे. चित्र काढून पूर्ण झाल्यावर त्या चित्रास सुबक रंग द्यायचा आहे. रंग कोणत्याही प्रकारचे वापरु शकता. उदा. तेलकट खडू, स्केच पेन, जल रंग, अक्रालीक रंग, रंगीत पेन्सिल, तैल रंग इत्यादी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते रंग वापरून चित्र छानपैकी स्वतः रंगवायचे आहेत. 

चित्रास रंग देऊन झाल्यावर एक तासाने त्या चित्राच्या कागदावर वरील उजव्या कोपऱ्यात (विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, इयत्ता, गट अ, ब  किंवा क आणि सुरु असलेले दोन मोबाईल नंबर) मराठी किंवा इंग्रजी भाषेत सुवाच्य अक्षरात पेनने लिहावे.

 

विद्यार्थ्यांनी हे चित्र स्वतः काढायचे आहे, यासाठी बहीण, भाऊ, आई, वडील किंवा मित्र यांची मदत घ्यायची नाही. त्यांचे कडून चित्र काढून घ्यायचे नाही. तशी शंका आल्यास आम्ही व्हिडीओ कॉल करून लाईव्ह आपणास तेच चित्र पुन्हा काढायला सांगू, त्यामुळे कुठलीही चिटिंग करु नये.

चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. फोटो काढतांना मोबाईल सरळ फक्त चित्रावरच धरावा. कागदाच्या आजूबाजूला जे ठेवले आहेत ते फोटोत दिसायला नको.

तो फोटो आम्हाला आमच्या 

shikshak.dhyey@gmail.com  

या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. ईमेल करतांना ईमेल मध्ये ‘Sub: विषय: गट अ, ब किंवा क साठी - चित्रकला स्पर्धासाठी आपले नाव (उदा. किरण पाटील) चे चित्र पाठवीत आहे.’ असे लिहावे.

खाली ई मेलच्या मजकुरात विद्यार्थ्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव, विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो मेलला जोडावा. इयत्ता, गट अ, ब किंवा क, शाळेचे पूर्ण नाव, शाळेचा पत्ता, दोन मोबाईल नंबर (वडील आणि आईचा), व्हाट्सएप नंबर आणि त्याखाली वडिलांचे नाव, घरचा संपूर्ण पत्ता, लँड मार्क, मु. पो. तालुका. जिल्हा, पिनकोड इत्यादी मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहावे. यासाठी आपल्या चित्रकला शिक्षक, आई, वडील, मोठा भाऊ किंवा बहीण यांची मदत घ्यावी.

त्या ई मेलला आपला चित्राचा फोटो अटॅच attach करावा, जोडावा व मेल send करावा.

 

ई मेल करता येणे शक्य नसल्यास वरील सर्व माहिती व फोटो आपण 96 23 23 71 35 या व्हाटसएप नंबरवर पाठवायचा आहे.

 

रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. 

तीनही गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.

 

 तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 51+ डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर किंवा ई मेल वर पाठविण्यात येईल.

 

चित्रकला स्पर्धेचा निकाल मंगळवार दि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी, बालदिनाच्या दिवशी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये जाहीर करण्यात येईल. 

विजेत्यांचे चित्र, विजेत्यांचा फोटो, शाळेचे नाव व पत्ता देखील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.

 


साप्ताहिक शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून यात दर सोमवारी एक याप्रमाणे पुढील वर्षभरात 52 अंक दिले जातात. सोबत मागील 160+ अंक देखील वाचण्यासाठी उपलब्ध होतील.

सवलत: स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक वर्गणी 500 रुपये नसून फक्त 200 रुपये राहील.

 

चित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क: 

 

गट अ साठी 50 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 250 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

 

गट ब साठी 100 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 300 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

 

गट क साठी 150 रुपये + वार्षिक वर्गणी 200 रुपये असे एकूण 350 रुपये नोंदणी शुल्क भरणे बंधनकारक आहे.

 

आपणास वार्षिक वर्गणीदार व्हायचे नसल्यास..  

अ गटासाठी 200 रुपये,

ब गटासाठी 250 रुपये व

क गटासाठी 300 रुपये  

नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

महत्त्वाच्या सूचना:

1) या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते पदवीत शिकत असलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतात.

2) नोंदणी शुल्क भरले नाही तर चित्र विचारात घेतले जाणार नाही.

3) पाठविलेले चित्र विद्यार्थी /विद्यार्थिनी यांनी स्वतः काढलेले व रंगविलेले असावे.

संशय आल्यास व्हिडीओ कॉल करून live पुन्हा एकदा चित्र काढावे लागेल, सबब विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढणे अपेक्षित आहे.

4) नोंदणी शुल्क रक्कम फोन पे, गुगल पे द्वारे 96 23 23 71 35 यावर पाठवावे. व त्याचा स्क्रिन शॉट पण 9623237135 या व्हाट्सएप नंबरवरच पाठवावा.

5) स्पर्धेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.

6) त्यांनी जाहीर केलेला निकाल अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.

7) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालायची, भांडण करण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.

8) नाशिक न्यायालय कक्षे अंतर्गत.

9) स्पर्धेचा निकाल, विजेत्यांचे फोटो, नाव व चित्रे न्यूज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे प्रसिद्ध केले जाईल.

10) राज्यस्तरीय साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये देखील विद्यार्थ्यांचे चित्र, फोटो, नाव, शाळेचे नाव व विद्यार्थ्यांची मुलाखत प्रसिद्ध केली जाईल.

11) दिनांक 31 ऑक्टोबर नंतर पाठविलेली चित्रे स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही.

12) नोंदणी शुल्क न भरलेली चित्रे विचारात घेतली जाणार नाही.

राज्यातील चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्गात सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जि. वर्धा आणि 'शिक्षक ध्येय'च्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.     




उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 वर किंवा आमच्या पुढील संपादकीय मंडळातील आपल्या गावाच्याजिल्ह्यातील संपादकप्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा.

शिक्षक ध्येय : राज्यस्तरीय संपादकीय मंडळ

संपादक:

मधुकर घायदार, नाशिक, ९६२३२३७१३५ 

 

कार्यकारी संपादक:

प्रभाकर कोळसे, वर्धा ९८२३५३९३२५

 

उपसंपादक/उपसंपादिका :

श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार 9158664041

 

कविता चौधरी, जळगाव 8806647390

 

मंजू वानखडे, अमरावती 9511780815

 

भाग्यश्री पवार, जळगाव 9890768735

 

श्रद्धा पवार, जळगाव 7507173163 

 

मेघा पाटील, नंदुरबार 9665189977

 

अर्चना भरकाडे, अमरावती 9970050246

 

संध्या (सामंत) सावंत; 9820981868

 

विजय अहिरे, नंदुरबार 9421538621

 

सुधाकर जाधव, औरंगाबाद 9552267501

 

अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी 8806504055

 

कैलास बडगुजर, ठाणे 8888284265

 

डॉ. माधव गावीत, नाशिक 9657557198

 

श्री. सतीश बनसोडे, नाशिक 9850883072

 

दिलीप जाधव, सांगली 7620848649 

 

आल्मेडा रॉबर्टसर पालघर 8850409911

 

संदिप बेलदार, नंदुरबार 9404410600

 

राजेंद्र लोखंडे, नाशिक 9158542985

 

धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869

 

मिलिंद दीक्षित, वर्धा 7972262333 

 

वैभव चेके, बुलढाणा 9730942608

 

पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार 8208841364

 

प्रविण घाडगे, सातारा 9503409123

 

संजय पवार, महाड, रायगड ९६८९८२१२१५

 

कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर 9561617374

 

खुशाल डोंगरवार, भंडारा 7588789975

 

विद्या वालोकर, वर्धा 9511892722

 

वसुधा नाईक, पुणे 9823582116

 

नितीन केवटे, नाशिक 7218601510 

 

प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६

 

संगीता पवार मुंबई 9869220963

 

भारती सावंत, मुंबई, 9653445835

 

स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662

 

प्रमिला गावडे, अहमदनगर 9404082419

 

सायराबानू चौगुले, रायगड 8484932146

 

अश्विनी दिक्षीत, पुणे 8308897258

 

भागवत मांदळे, नाशिक 9921218240

 

उल्केशकुमार वाळूंजे, औरंगाबाद 9403009449

 

शितल चौधरी, मुंबई 9619943927

 

संगीता पवार, मुंबई 9869220963

 

किरण काळे, पुणे 8888800745

 

ललित पाटील, पालघर 9209516535

 

सौ. मृगया मोरे, रत्नागिरी 9422733960

 

विद्या देवळेकर रत्नागिरी 9420154899

 

प्रमिला गावडे, श्रीगोंदा, 9404082419

 

ज्योती परदेशी, नाशिक 9420299484

 

नंदा परदेशी, धुळे 9689913390

 

आदिनाथ सुतार, अहमदनगर ९८९०७०९१७५

 

पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग, 9421189575

 

अनुप कुलकर्णी, नाशिक 9767750878

 

अजय भालेराव, अहमदनगर ७९७२०३५४१६

 

डॉ. म्हातारदेव निंबा म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०

 

चेतन पाटील तळोदा जि नंदुरबार 9420440181

 

समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285

 

साईनाथ कनिंगध्वज तालुका जुन्नर 9420949401

 

सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241

 

सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१

 

विष्णू ढेबे, सातारा, ७५८८६८६०६५

 

तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५

 

डॉ. अर्चना झाकडे - इंगळे, औरंगाबाद, ८८०५२२६४५९

 

विठ्ठल भालेराव, गंगापूर, जि. औ. बाद 9421409054

 

दिपक सोनवणे, सिल्लोड जि. औ. बाद 9860107398

 

शोभा माने, लातूर 9421552517

 

महादेव शरणप्पा खळूरे लातूर 8796665555

 

राजेश चायंदे, अमरावती ८९२८९५०७१६

 

अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९

 

अतुल पडोळे अमरावती 9421823474

 

डॉ. तक्षशीला मोटघरे अमरावती 9823413413

 

महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067

 

सी एच बिसेन, गोंदिया 8390678303

 

आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर, कर्नाटक राज्य 9535503233

 

यांनी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.

 



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz