Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

Shikshak Dhyey: EdTech Entrepreneur Award

  ‪Congratulations! from Mentor Dada 🎉🎊 ----- Shikshak Dhyey India ----- We are proud to award you with the title of * EdTech Entrepreneur Award * * for enrolling students in one of the Top Trending Courses in June 2023 *. We salute your dedication towards making high quality education accessible to students across the world. Please find attached, a small token of appreciation from us and share it with the world to celebrate. ----- All the best for more such feats in the future! 👍 JOIN TODAY https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz Join our WhatsApp Group Today https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D Shikshak Dhyey India App: Available on Google Play Store, download Today https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz संपादकीय मंडळ, शिक्षक ध्येय, महाराष्ट्र https://www.shikshakdhyey.in

सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३: २४ हजार+ बक्षिसे जिंका

  सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३: २४ हजार+ बक्षिसे जिंका शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित सकाळ स्कॉलर🎖️ प्रश्नमंजुषा स्पर्धा 2023  शालेय स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी, शब्दकोडे, विविध कौशल्ये, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश या विषयांवर आधारीत खास सदर... दिनांक १ जुलै २०२३ पासून या सदरात प्रसिद्ध होणाऱ्या १०० पैकी, कोणत्याही ९० प्रश्नांची उत्तरे कुपनसह प्रवेशिकेवर चिकटवा आणि बक्षीसे जिंका.. 🎁 १ कोटीहून जास्त किंमतीची स्मार्ट वॉच, गिअर सायकल, क्रिकेट किट, स्कूल बॅग, कंपास बॉक्स व उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स अशी २४,००० पेक्षा जास्त बक्षिसे... चला तर मग करा तयारी भविष्याची... जिंका बक्षिसे लाखोंची! आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याला सांगून रोजचा सकाळ अंक घरी सुरु करा...  (नाशिक जिल्हा मर्यादित) अधिक माहितीसाठी संपर्क साधा:  9881598815 आमच्या परिवारात आजच सामील व्हा... https://chat.whatsapp.com/F3n9kbAfte8AopJk7iPc7D शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

उद्यापासून पॕन (PAN) होणार अकार्यरत

    उद्यापासून पॕन होणार अकार्यरत पॕन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आपले आधार कार्ड आणि पॕन कार्ड लिंक करणे या अत्यंत सोप्या गोष्टीसाठी असंख्य वेळा दिलेली मुदतवाढ, जी आज 30 जून 2023 रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे. आपल्यापैकी कोणीही हे लिंक करायचे राहिले नसेलच. जर लिंक केले नसेल तर उद्या दिनांक 1 जुलै 2023 पासून आपले PAN Card आपोआप अकार्यरत होईल. आयकर रिटर्न वरील व्याज मिळणार नाही. अतिरिक्त कर, टीडीएस कापला जाईल. प्राप्तिकर विवरण भरता येणार नाही. एका दिवसाला 50 हजार रु. पेक्षा जास्त रक्कम बँकेत भरता येणार नाही. अकार्यरत झालेले PAN कार्यरत करण्यासाठी 1 हजार रु. दंड भरावा लागेल.. आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी खालील लिंकवर आत्ताच क्लिक करा... Link 1. for Adhaar pan Link status &Verification लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी : CLICK HERE Link 2 for pan and Adhaar number link registration लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी : CLICK HERE आमचा व्हॉट्सॲप ग्रुप.. https://chat.whatsapp.com/IcmTeHgRugkAjASYSv3cj9 शिक्षक ध्येय: डिजिट

RBI: सरकारी नोकरी

  RBI: सरकारी नोकरी  भारतीय रिझर्व्ह बँकेने कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक आज 30 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... क्लिक करा... CLICK HERE WhatsApp Group.. https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY शिक्षक ध्येय इंडिया ॲप.. https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

विठू लेकूरवाळा

  विठू लेकूरवाळा             विठू आहे लेकूरवाळा           संगे भक्तांचा गोतावळा              किती छान वाटतंय ! माझे वारकरी भक्त माझ्या भेटीसाठी गावागावांतून पंढरीत या चंद्रभागेच्या तीरावर तंबू ठोकून राहणार आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून अनवाणी पायाने पुरुषभक्त भगव्या पताका , झेंडे खांद्यावर सावरत आणि भक्तस्त्रियां तुळशीचे वृंदावन डोईवर घेऊन चालत येत आहेत. येताना माझ्या संतभक्त ज्ञानोबा , तुकोबांनाही भेटून आले आहेत. पांढरा सदरा , पायजमा किंवा धोतर आणि डोईवर पांढरी गांधी टोपी किंवा पागोटे घालून टाळ चिपळ्यांच्या निनादात ते मार्ग आक्रमित आहेत. माझ्या भेटीची ओढ अनावर होवून माझ्या पायांवर दंडवत घालणार आहेत. मी त्यांचा सावळा विठू भक्तीचा भोळा आहे. त्यांची निरिच्छ , निरागस भक्ती मला खूप भावते म्हणून मी त्यांना दर्शन देण्यासाठी अठ्ठावीस युगांपासून रुक्मिणीसंगे विटेवर करकटीवर ठेवून उभा आहे. माझे भक्त आनंदाने आपल्या अश्रूचे सिंचन माझ्या पायी करतात.                      दूरदूरच्या गावाहून मजल दरमजल करत हे वारकरी भक्त माझे नाम मुखात घेवून नाम्या , तुक्या , नामा एकाने लिहिलेले अभंग , कीर्तन

सरकारी नोकरी: 12 वी किंवा ITI उत्तीर्ण

  सरकारी नोकरी: 12 वी किंवा ITI उत्तीर्ण  नेहरु सायन्स सेंटर यांनी ऑफिस असिस्टंट आणि  पदांसाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण आणि टेक्निशियन पदांसाठी आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 जून. जाहिरात काळजीपूर्वक वाचावी CLICK HERE WhatsApp Group https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP For Compititive Exam https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

देवशयनी एकादशी म्हणजे काय?

  देवशयनी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. एकादशी व्रताला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे . दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकारमास किंवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी  म्हणतात . काही ठिकाणी या तिथीला ' पद्मनाभ  ' असेही म्हणतात. सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा ही एकादशी येते. या दिवसापासून चातुर्मास सुरू झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात झोपतात आणि त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी जेव्हा सूर्य तूळ राशीत जातो तेव्हा ते उठतात. त्या दिवसाल

साप्ताहिक शिक्षक ध्येय 26 जून 2023

  साप्ताहिक शिक्षक ध्येय 26 जून 2023 संपादकीय .... इडा पिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे...                              बळीसाठी आपला गाव स्वर्गासमान असतो. त्याला गावच्या मातीची ओढ असते. गावाची सेवा करण्यातच तो धन्यता मानतो. पण त्याला जगवणाऱ्या काळ्या आईला तो खूप मानतो. म्हणूनच शेती कसणे त्याचे परम कर्तव्य असते. त्याचे कुटुंब याच काळ्या आईच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे तिचेही ऋण तो मानत असतो. बळी शहरात कधीच रमु शकत नाही. शहराचे धकाधकीचे आयुष्य त्याच्या अंगवळणी पडू शकत नाहीत. या मातीतील अन्न खाऊन आपली जोपासना झाली , तिच्यात हाडाची काडे केली. शेवटी मेल्यानंतरही या काळ्या मातीतच आपल्या देहाची माती व्हावी अशी त्याची इच्छा असते. शहरात असणारे चंगळवादी जीवन त्याला आकर्षित करत नाही. गावात स्वच्छ , प्रदूषणविरहीत जीवन जगताना त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. वडिलोपार्जित वाड्यात त्याचा रहिवास म्हणजे स्वर्गच. मळ्यात पिकलेला भाजीपाला त्याला इंद्राच्या नंदनवनाहूनी मौल्यवान वाटतो. कारण त्यात त्याचा घाम गाळलेला असतो. आपल्या कष्टाचे चीज करून देणारी ही काळी आईच असते. ती त्याला प्राणा

'रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका' स्पर्धेचा निकाल

  दिनांक ५ जून २०२३ रोजी मातृसेवा फौंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा , सेल्फी काढा , बक्षीस जिंका या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून उत्फूर्त प्रतिसाद लाभला. १२ जून पर्यंत २० फोटो, १९ जून पर्यंत ०३ फोटो, २६ जून पर्यंत ०९ फोटो असे एकूण ३२ झाडे लावतांनाचे सेल्फी, फोटो प्राप्त झाले. कोणत्याही उपक्रमाविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रचंड अनास्थाच यातून अधोरेखित होते. खेदाने नमूद करावेसे वाटते की, सर्वांकडून मिळालेला प्रतिसादही....  पुढील अंकात या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.... संपादक.

विद्यार्थ्यांनो, आता ५ वी व ८ वीला वार्षिक परीक्षा होणार, नापास झाल्यास...

  विद्यार्थ्यांनो, आता ५ वी व ८ वीला वार्षिक परीक्षा होणार, नापास झाल्यास... शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून, आता पाचवी आणि आठवी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. या पूर्वी मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आठवीपर्यंत  पास करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. नापास विद्यार्थ्यांना एक संधी.. राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास दोन महिन्यात पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही तो विद्यार्थी अनुत्तीर्ण, नापास झाल्यास त्याला इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्याला

नवोदय विद्यालय समिती: निकाल जाहीर

  नवोदय विद्यालय समिती Navodaya Vidyalaya Samiti.... Online applications for admission to VI 2024 - 25. ... CLICK HERE  To view the Results for Class VI JNVST 2023...... CLICK HERE अधिक माहितीसाठी... CLICK HERE  https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

सुवर्णसंधी...

  सुवर्णसंधी... आजच साप्ताहिक शिक्षक ध्येयचे वार्षिक वर्गणीदार व्हा...आणि वाचा 20 एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंतचे सर्व 146 अंक + यापुढील वर्षभरात 52 अंक म्हणजेच फक्त 500 रुपयांत वाचा 146+52=198 शिक्षक ध्येयचे दर्जेदार अंक... अटी लागू मागील 146 अंक वाचण्यासाठी आत्ताच खालील लिंकवर क्लिक करा... tinyurl.com/bddp2rje Feel free to call: 96 23 23 71 35

ITI: आजच प्रवेश घ्या...

  ITI: आजच प्रवेश घ्या... शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथील प्रवेशासाठी संस्थेतील उपलब्ध व्यवसाय, प्रशिक्षण कालावधी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश क्षमता, CAP सीट्स, IMC सीट्स, IMC शुल्क, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, रोजगारासाठी उपलब्ध कंपन्या, एकूण उपलब्ध अभ्यासक्रम यादी, कॅटेगरी नुसार प्रशिक्षण व इतर शुल्क, संपूर्ण माहिती पत्रक तसेच प्रवेशाचे वेळापत्रक, हॉस्टेलची व्यवस्था, आदिवासी मुले व मुलींसाठी दरमहा 500 रु. निर्वाह भत्ता, मुलींसाठी मोफत बस पास सुविधा, नोकरीसाठी रोजगार मेळावे व मार्गदर्शन, प्रशिक्षण कालावधीत नामांकित कंपनीत On Job Training, मान्यवरांची व्याख्याने आदी सविस्तर माहिती आजच जाणून घ्या... त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक माहितीपत्रक साठी... CLICK HERE प्रवेश सत्र ऑगस्ट 2023 चे संपूर्ण वेळापत्रक साठी... CLICK HERE शैक्षणिक माहितीसाठी... https://chat.whatsapp.com/DilsYhuRDjS4VNhKvtbX3L स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

योगा: सुदृढ जीवनाचा मार्ग

योगा: सुदृढ जीवनाचा मार्ग                                                                                     लेखक प्रदिप देवरे,  प्राथमिक शिक्षक, निफाड, जिल्हा नाशिक 9665224258                                “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |          तत्स्वयं योगसंसिध्द: कालेनात्मनि विन्दति ||”  अर्थात  या जगात दिव्याज्ञानापेक्षा शुद्ध अन्य काहीच नाही . जि व्यक्ती दीर्घकालीन योगाच्या अभ्यासाद्वारे मनाला शुद्ध करते ,अशी व्यक्ती योग्य वेळी हृदयात या ज्ञानाचे आस्वादन करत असते.              बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो की योगा फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे , त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. योगा हजारो वर्षांपासून संशोधित सुदृढ आरोग्याचा मार्ग आहे . आणि आता त्याचं आरोग्यदायी महत्व संपूर्ण जगाणे मान्य केले आहे. जगभरातील अने विद्यापी

योग: एक आनंदमय प्रवास

  योग: एक आनंदमय प्रवास ‘ गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञाना विना आत्मा नाही ’          गुरुचे महत्व आयुष्यात प्रत्येकाला माहिती आहे. हा गुरू आपल्याला इच्छित स्थळी जाण्यासाठी मदत करतो , योग्य मार्गदर्शन करतो , त्याच प्रमाणे शरीराला आत्मा पर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा गुरु मदत करतो. आपण आयुष्यात अनेक प्रवास केले आहेत पण शरीराला मनाशी जोडणारा प्रवास कधी केला आहे का ? शरीर आणि मन यांना जोडणारा प्रवास   म्हणजेच योग. योग म्हणजे जोडणे. शरीराला मनाशी आणि आंतरआत्म्याशी , किती अनमोल असे महत्व आहे योगासनाचे.   आपल्याला माहिती आहे की भारत देशात अतिप्राचीन काळी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी योगा ची निर्मिती झाली आहे . भारत हा देश योगाचा उगमस्त्रोत आहे. भारतीयांनी संपूर्ण जगाला योगाचा परिचय करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण शरीराचे सगळे लाड आवर्जून पूर्ण करतो त्याच प्रमाणे मनाची शांती मिळणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मनाला स्थिरत्व प्राप्त होणे खूप महत्वाचे आहे , हे मिळवण्यासाठी योग हा उत्तम मार्ग आहे. शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होऊन दिव्यत्व प्राप्त होणे साधी गोष्ट नाही ज्यांना यांचा अनुभव