विद्यार्थ्यांनो, आता ५ वी व ८ वीला वार्षिक परीक्षा होणार, नापास झाल्यास...

 



विद्यार्थ्यांनो, आता ५ वी व ८ वीला वार्षिक परीक्षा होणार, नापास झाल्यास...


शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून, आता पाचवी आणि आठवी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

या पूर्वी मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार आठवीपर्यंत  पास करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

नापास विद्यार्थ्यांना एक संधी..

राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास दोन महिन्यात पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही तो विद्यार्थी अनुत्तीर्ण, नापास झाल्यास त्याला इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्याला बसविले जाणार आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप योग्य वर्गात प्रवेश दिला जाईल. पण सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला बंधनकारक असेल.

पत्रानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल. जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र पुनर्परिक्षेत नापास झाल्यास त्याला पुन्हा वर्षभर पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच बसावे लागणार आहे..


शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY


शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

महाराष्ट्र शासनाचे राजपत्र वाचण्यासाठी...

CLICK HERE 


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग