साप्ताहिक शिक्षक ध्येय 26 जून 2023
संपादकीय ....
इडा पिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे...
बळीसाठी आपला गाव स्वर्गासमान असतो. त्याला गावच्या मातीची ओढ
असते. गावाची सेवा करण्यातच तो धन्यता मानतो. पण त्याला जगवणाऱ्या काळ्या आईला तो
खूप मानतो. म्हणूनच शेती कसणे त्याचे परम कर्तव्य असते. त्याचे कुटुंब याच काळ्या
आईच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे तिचेही ऋण तो मानत असतो. बळी
शहरात कधीच रमु शकत नाही.
शहराचे धकाधकीचे आयुष्य त्याच्या अंगवळणी पडू शकत नाहीत. या
मातीतील अन्न खाऊन आपली जोपासना झाली, तिच्यात हाडाची काडे केली. शेवटी
मेल्यानंतरही या काळ्या मातीतच आपल्या देहाची माती व्हावी अशी त्याची इच्छा असते. शहरात
असणारे चंगळवादी जीवन त्याला आकर्षित करत नाही. गावात स्वच्छ, प्रदूषणविरहीत जीवन जगताना त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटतो.
वडिलोपार्जित वाड्यात त्याचा रहिवास म्हणजे स्वर्गच. मळ्यात पिकलेला भाजीपाला
त्याला इंद्राच्या नंदनवनाहूनी मौल्यवान वाटतो. कारण त्यात त्याचा घाम गाळलेला
असतो. आपल्या कष्टाचे चीज करून देणारी ही काळी आईच असते. ती त्याला प्राणाहूनही
प्रिय असते. अशा या बळीराजाने घामाचे पाणी सांडून, दिनरात
अंगमेहनत करून पिकविलेल्या शेतमालाला कधी कमी लेखू नका. त्याच्या दरासाठी घासाघीस
करू नका नाहीतर तो बिथरून जातो. झाडाचा फास गळ्यात टाकतो आणि आपले जीवन संपवितो.
बळी जगाचा पोशिंदा आहे.
आज तो आहे म्हणून आपण सुखाने चार घास खाऊ शकतो. त्याच्या
निढळावरच्या घर्मबिंदुंचा मान राखूया. आपणाला लागणाऱ्या भाजीपाला, फळे,
धान्य आणि कडधान्यांचा तो आपणास पुरवठा करतो आपणही त्यास सहकार्याचा
हात देऊ.
आज निसर्गाच्या अवकृपेने तो त्रस्त झाला तर त्यास फूल ना फूलाची पाकळी देऊ पण जगाच्या या पोशिंद्याला सर्वतोपरी मदत करू या...
शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE
साप्ताहिक शिक्षक ध्येय
(प्रथमच अंकात चित्रपट, गाणे, रेडिओ, कथा, लेख, विनोद, नोकरीच्या जाहिराती, सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची सविस्तर यादी, आणि अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेची माहिती, मुदत कर्ज योजना मध्यम व लघु व्यावसायिकांसाठी, कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्याला अर्थ सहाय्य, वृध्द व अपंगांसाठी योजना, सर्व योजनांची सविस्तर माहिती पुस्तिका (एकूण पाने १६) कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक)
वर्ष ४ थे; अंक ११ वा; सोमवार, दिनांक २६ जून २०२३
*रोखठोक मध्ये वाचा: बळीराजा: सुखी भव: सौ. भारती सावंत, मुंबई.
आजच्या अंकातील *मॉम हा हिंदी चित्रपट* नक्की बघा.
*विशेष आकर्षण: पुस्तिका : सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची सविस्तर यादी, आणि अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेची माहिती, मुदत कर्ज योजना मध्यम व लघु व्यावसायिकांसाठी, कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्याला अर्थ सहाय्य, वृध्द व अपंगांसाठी योजना, सर्व योजनांची सविस्तर माहिती पुस्तिका (एकूण पाने १६) नक्की वाचा.
★ संपादकीय: रोपट लावा, फोटो काढा आणि बक्षीस मिळवा...
★ स्पर्धेची संपूर्ण माहिती व मुखपृष्ठावर झळकण्याची संधी...
★ झाडे लावतानाचे फोटो
★ काळया मातीत मातीत तिफन चालते: श्री. नागेश कांबळे, पुणे
★ Breaking the glass ceiling: Women Shatter Barriers in Business, Politics, and Beyond: Dr. Aashish Deoorkar, Amaravati.
★ डिजिटल स्क्रोलिंग बोर्ड: नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम: तारीश अत्तार, सांगली.
★ स्कूल चले हम: सौ. मृगया मोरे, रत्नागिरी
★ इंग्रजी अमलातील शिक्षण पद्धती: मंजू वानखडे, अमरावती.
★ अमृतधारा: डॉ. पं. प्रसादशास्त्री कुलकर्णी, नाशिक.
★ पर्यावरण संवर्धनासाठी सहशालेय उपक्रम: श्री. प्रकाश कानूरकर, सिंधुदुर्ग
★ अनंत अमुची ध्येयासक्ती आणि अनंत आशा: सरिता माने - पाटील, सांगली.
★ माझा आवडता रॉकी: तन्मय खांडेभराड, इयत्ता पाचवी, बुलढाणा.
★ योग: आनंद जाधव, बिदर, कर्नाटक.
★ आरोग्यंम धनसंपदा: केशव डफरे, अमरावती.
★ पाऊस गाणे गाती: सौ. सुजाता जांबोटकर, रत्नागिरी.
★ जांभा दगडाचा सडा: सौ. मृगया मोरे, रत्नागिरी.
★ बाप: वाल्मीक सोनवणे, देवळा, जिल्हा नाशिक.
★ पावसाची अडवणूक: डॉ. एम. एच. गावीत, अभोना, नाशिक
★ आई: विद्या देवळेकर, रत्नागिरी.
★ प्राण्याची शाळा: वसुधा नाईक, पुणे
★ पाऊस: श्रीमती मेघा पाटील, नंदुरबार.
★ एक पाऊस एकदा: श्रीमती व्ही. वाय. पाटील, जालना.
★ मैत्री: खुशाल डोंगरवाऱ, भंडारा.
★ राज्यातील सर्व शिक्षकांसाठी पुरस्कार: महाराष्ट्र शासन
★ केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स: पान नंबर 37.
*यासारखे अनेक वाचनीय लेख...
*सोबत...
★ कविता, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, डिजिटल साक्षरता, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, विचार सुमने, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला, नोकरीच्या 12 जाहिराती आदी अनेक वाचनीय सदरे...
*एकूण पाने : 119
★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...
_★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध
*विद्यार्थ्यांसाठी खालील ॲपवर आजचा अंक उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...
*_शिक्षक ध्येय ऍप
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (31,649 सदस्य)
https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9
*_कौशल्य विकास ॲप_*
https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section
*_यु ट्यूब चॅनल_*
https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ
*_संकेतस्थळ: नोकरीच्या जाहिराती_*
*_टेलीग्राम:_*
*_इंस्टाग्राम:
https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln
*_फेसबुक:_*
https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1
*_फेसबुक पेज:_*
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/
*_फेसबुक पब्लिक ग्रुप:_*
https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share
*_ट्विटर_*
https://twitter.com/ShikshakDhyey?s=08
*_लिंकडीन_*
https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889
*_ई मेल:_*
*_153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य_*
https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY
*_Follow on the Koo App_*
शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय