योग:
एक आनंदमय प्रवास
‘गुरु विना
ज्ञान नाही आणि
ज्ञाना विना आत्मा नाही’
गुरुचे महत्व आयुष्यात प्रत्येकाला
माहिती आहे. हा गुरू आपल्याला इच्छित स्थळी जाण्यासाठी मदत करतो, योग्य
मार्गदर्शन करतो, त्याच प्रमाणे शरीराला आत्मा पर्यंत
पोहोचवण्यासाठी सुद्धा गुरु मदत करतो. आपण आयुष्यात अनेक प्रवास केले आहेत पण
शरीराला मनाशी जोडणारा प्रवास कधी केला आहे का? शरीर आणि मन यांना जोडणारा प्रवास म्हणजेच योग. योग म्हणजे
जोडणे. शरीराला मनाशी आणि आंतरआत्म्याशी, किती अनमोल असे
महत्व आहे योगासनाचे.
आपल्याला
माहिती आहे की भारत देशात अतिप्राचीन काळी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी योगा ची
निर्मिती झाली आहे. भारत हा देश योगाचा उगमस्त्रोत आहे. भारतीयांनी संपूर्ण जगाला योगाचा
परिचय करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण शरीराचे सगळे लाड आवर्जून पूर्ण करतो
त्याच प्रमाणे मनाची शांती मिळणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मनाला स्थिरत्व
प्राप्त होणे खूप महत्वाचे आहे, हे मिळवण्यासाठी योग हा
उत्तम मार्ग आहे. शरीरातील
कुंडलिनी शक्ती जागृत होऊन दिव्यत्व प्राप्त होणे साधी गोष्ट नाही ज्यांना
यांचा अनुभव आलेला आहे ते महान होऊन गेले आहेत हे सर्व फक्त मनुष्यजन्म यातच शक्य
आहे.
२१ जून २०१५ या दिवसापासून
संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून ला मान्यता मिळाली आहे १९३
देशांपैकी १८० देशात हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
आयुष्य जगायचे असेल तर आतून-बाहेरून निर्मळ असणं फार महत्त्वाचे
आहे. यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. शालेय जीवनातच योगासनाचे महत्त्व मुलांना
पटवून देणे फार महत्वाचे आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्या- साठी सुद्धा योगाचा
अवलंब करणे योग्य ठरेल. मनुष्यजन्म सार्थकी लागण्यासाठी योगा उत्तम दुवा आहे.
जगाला सुद्धा योगचे महत्व पटलेले आहे. भविष्यातील येणाऱ्या आजारांवर योग हा उत्तम
मार्ग आहे. शरीराची व मनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगासन उपयुक्त आहे. दीर्घ
आयुष्य जगण्यासाठी योग उत्तम पर्याय आहे हे सर्व जगाला कळाले आहे म्हणूनच आपण २१
जून या दिवशी योग दिवस म्हणून साजरा करतो. या पृथ्वीवर मनुष्यप्राणी भाग्यवान आहे
ज्याला योगासन चा मार्ग अवलंबिता येतो. चला तर मग मनाशी एक उत्तम संकल्प करूया आणि
आजपासून योगासनाचा मार्ग स्वीकारू या...
★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...
शिक्षक ध्येय ऍप
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (31,568 सदस्य)
https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9
*_कौशल्य विकास ॲप
https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section
*_यु ट्यूब चॅनल_*
https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ
*_संकेतस्थळ: नोकरीच्या जाहिराती_*
*_टेलीग्राम:_*
*_इंस्टाग्राम:_*
https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln
*_फेसबुक:_*
https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1
*_फेसबुक पेज:_*
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/
*_फेसबुक पब्लिक ग्रुप:_*
https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share
*_ट्विटर_*
https://twitter.com/ShikshakDhyey?s=08
*_लिंकडीन_*
https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889
*_ई मेल:_*
*_153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य_*
https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY
*_Follow on the Koo App_*
शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE