दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव!

 


दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे.

          सदया शाळा बंद आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. खरोखरच काही गावांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आमचे शिक्षक जीवाचे रान करतांना दिसत आहे.  
       
फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, दिवे, पणत्या, लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करीत कोरोनाचा प्रभाव लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना आपण सर्व करू या...

यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या...

आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत... शिक्षक ध्येयचा “दिवाळी अंक”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार, वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक...

यंदा दिवाळी अंकात मा. शिक्षण मंत्री, अपर सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, सीईओ, संचालक यांच्या शुभ संदेश आणि मुलाखतींचा समावेश आणि दर्जेदार कथा, कविता, वात्रटिका, हास्यविनोद, व्यंगचित्रे, नवीन शैक्षणिक धोरणाचा लेखाजोखा वाचा... आमच्या राज्यातील शिक्षक बांधवांच्या लेखणीतून...  वाचायलाच हवा असा अप्रतिम अंक आपल्या सर्वांच्या सहकार्यातून साकारला आहे...
‘शिक्षक ध्येय’चा पहिलाच अंक आपल्या हाती देत आहोत. त्यासाठी संपादक – प्रकाशक म्हणून सर्वस्तरीय लढाई नक्कीच करावी लागली. परंतु ती ‘आस्तित्व लढाई’ म्हणून आम्ही मान्य केली आहे. आपणही या आमच्या प्रयत्नांना बळ देत राहावे, हिच इच्छा.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी वाचन करायलाच हवे...  कारण शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची.
चला तर मग यंदा या दिवाळी अंकाचे वाचन करून स्वत:ला सिद्ध करू या...

आपले सर्वांचे एक हक्काचे व्यासपीठ... नेहमीच...

मधुकर घायदार, संपादक

https://shikshakdhyey.com/subscriber/ 

दिवाळी विशेषांक

Diwali Special Issue

It has a readership of 3 lakh+

https://online.fliphtml5.com/kmrnp/kizf/

घरबसल्या डाउनलोड न करता ऑनलाइन 'शिक्षक ध्येय' जरुर वाचा... 

click the link

https://online.fliphtml5.com/kmrnp/kizf/

 

https://drive.google.com/file/d/1V7jZA4iYkN_jolsYkMznmo6mQABcNneR/view?usp=drivesdk 

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग