Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार 17 नोव्हेंबर 2025

 



शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार 17 नोव्हेंबर 2025


संपादकीय...

 

 मोबाईलच्या जाळ्यात

           

            या आधीच्या पिढीला मनोरंजनाची काहीच संसाधने नसल्यामुळे अभ्यास एके अभ्यास आणि उरलेल्या वेळेत मुलाने बाबांना शेतीच्या कामात आणि मुलींनी आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करायची असा दंडक असे. त्यामुळे मुलांनी वावगे वागलेले खपवून घेतले जात नसे. सर्वांच्या घरात सारखीच परिस्थिती. मनाची जिद्द आणि परिश्रम यांच्या जीवावर ती मुले खूप शिकून मोठी झाली. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या.

त्यानंतर सदया मात्र आई-वडील दोघेही कमावते असल्याने आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या अपत्याला द्यायचे अशी आई वडीलांची मानसिकता झाली. त्यामुळे हल्ली मुलांना ते सर्व सुखसोयी उपलब्ध करून देत आहेत. आपण आपल्या मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही म्हणून बाहेरचे जंक पदार्थ खाण्यासाठी, शॉपिंग, सिनेमासाठी मुबलक पैसे पुरवितात. करमणुकीसाठी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक घेऊन देतात. परंतु अपत्य आपला वेळ अभ्यासात न घालवता दूरदर्शनमध्ये व्यतित करते. आपणाकडे असलेल्या वेळेचा उपयोग ते मोबाईल, लॅपटॉपवरील गेम खेळून वाया घालवते. ना त्या मुलाला वेळेचे महत्त्व, नाही आई-वडिलांचे त्याच्यावर काटेकोरपणे लक्ष. यामुळे ही पिढी मोबाईलच्या जाळ्यात गुरफटत चालली आहे. त्यांना बसल्या जागी हवी ती वस्तू मिळत आहे, त्यामुळे पैशाचे मोलही समजत नाही आणि ते पैसे कमवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना किती परिश्रम करावे लागतात हे देखील कळत नाही.  आई-वडीलपण मुलांना समजावून सांगत नाहीत.

          एकदा अशा चंगळवादी जीवनाची सवय झालेले मूल आपली सारासार बुद्धी देखील हरवून बसते. आपल्या आई-वडिलांनी खस्ता खाऊन शिक्षण घेतले तेव्हा ते आज एवढे पैसे मिळवत आहेत.

          आज उच्च पदावर काम करत आहेत. आपणही अभ्यास करून, मेहनत करून आपले नाव उंचावले म्हणजे आपले भवितव्य सुधारेल हे त्यांना कळत नाही. आज आपण आराम करत आहोत तो कायमस्वरूपी नाही तर तात्पुरता आहे. तो आई वडिलांच्या जीवावरचा आहे. आज आपण आराम केला तर पुढे हराम होणार आहे हे त्यांना समजले तर ते मूल अभ्यास करून यश मिळवेल आणि आपले भविष्य सुधारत पुढचे जीवन आनंदाने, आरामात व्यतित करेल. आपल्याला काय वाटते?


आजचा साप्ताहिक शिक्षक ध्येय संपूर्ण अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


CLICK HERE इथे क्लिक करा..





  

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz