संपादकीय...
आली माझ्या घरी ही दिवाळी...
दिवाळी
हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत
असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे.
दिवाळी साऱ्या जगभर
प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर
ज्ञानाच्या विजयाचा हा सण आहे.
फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, दिवे, पणत्या, लायटिंग आदि
नेहमीप्रमाणेच साजरे करू या...
यंदा दिवाळीत आपण वाचनाचा
देखील आनंद लुटू या...
आपला दिवाळी उत्सवाचा आनंद
द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत...
‘शिक्षक ध्येय’चा “दिवाळी
अंक”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार, वाचनीय आणि
संग्रही असा दिवाळी अंक...
यंदा दिवाळी अंकात
वाचा...अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण दीपावली; दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा;
आशेचा प्रकाश एकतेचा सण दिवाळी; दिवाळी लक्ष्मीपूजन; धावपळीतील ओवाळणी; दिवाळी आणि
भारतीय संस्कृती; आकाशकंदील का लावला जातो?; दिवाळीच्या आठवणी; रांगोळी; विविध कौशल्य
आत्मसात करणे: काळाची गरज; प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करु या; लहानपण देगा देवा; अल्फ्रेड
नोबेल; तिमिरातूनि तेजाकडे; पाढे बनविण्याची नवीन सोपी पद्धत; पाककृती अनारसे; पारितोषिक
प्राप्त उपक्रम, कविता, विनोद, बालचित्रे, दिवाळी स्पेशल रांगोळी, सरकारी
नोकरीच्या विविध जाहिराती आणि बरेच काही... आमच्या शिक्षक बांधवांच्या लेखणीतून... वाचायलाच हवा असा अप्रतिम अंक आपल्या
सर्वांच्या सहकार्यातून आकारास आला आहे...
विद्यार्थी आणि
शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी वाचन करायलाच हवे... कारण शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी
मनाला वाचनाची. यंदा या दिवाळी अंकाचे वाचन करून स्वत:ला सिद्ध करू या...
आपले एक हक्काचे
व्यासपीठ... नेहमीच...
संपादकीय मंडळ