साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार २२ जानेवारी २०२४

 



साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार २२ जानेवारी २०२४

संपादकीय...

एकही नारा.. एकही नाम.. ‘जय श्रीराम’

    जय  श्रीराम  हा  केवळ  एक  जयघोष  नाही  तर  समस्त  भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे. भारतीयांचे अवघे जीवन  श्रीरामांनी  व्यापलेले  आहे.  

प्रभू रामचंद्र हे श्रीविष्णू देवतेचा सातवा अवतार मानले जातात. प्रभू रामचंद्र यांचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 

     अयोध्येत आज २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री राम यांची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरीत करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

२२ जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

   केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतात एक आनंदाचे वातावरण आहे. 

   चला तर मग आज पुन्हा एकदा दिवे, पणती लावू या. विद्युत रोषणाई करु या. भारतातील प्रत्येक घर आकाश कंदील आणि लायटिंगच्या माळांनी सजवू या.. 

   संपूर्ण देशभरात मोठा अपूर्व असा सोहळा होत आहे, ज्याने सर्व राम भक्तांचे डोळे दिपून निघणार आहेत.


WhatsApp Group..

https://chat.whatsapp.com/IQm8H1LrwvALRWORtnUDfP


Website...

https://shikshakdhyey.co.in


संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी...

येथे क्लिक करा.. Click Here 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग