साप्ताहिक शिक्षक ध्येय २८ ऑगस्ट २०२३

 



संपादकीय...

 

 

डिजिटल रक्षाबंधन...  

काळ बदलला तसा प्रत्येक सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी बहिणीचे लग्न झाल्यावर बहीण दुसऱ्या गावी राहायला गेली की फक्त सणासुदीलाच माहेरी येत असे. राखी पौर्णिमा आली की भाऊ-बहीण दोघांचेही ऊर आनंदाने भरून यायचे कारण होते बहिणीला मिळणारी राखी पौर्णिमाची खास भेट. पूर्वीपेक्षा आता याचे महत्त्व दिवसें दिवस कमी कमी होताना जाणवते. आज हा सण साजरा करतांना बहीण भावाची प्रत्यक्ष भेट होत नाही. भाऊ आणि बहीण यामध्येच हा मोबाईल आला अन् रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आनंद या मोबाईलने हिरावला.

सद्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली जाते. सद्या बहीण भावांकडे न जाताच हा सण साजरा होतो. पोस्टाने, कुरिअरने किंवा डिजिटल सोशल मीडियाद्वारे बहीण आपल्या भावाला राखी पाठवते. फोन पे, गुगल पे द्वारे रोख रक्कम किंवा ऑनलाईन खरेदी केलेले एखादे गिफ्ट भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून पाठविले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात भेट वस्तूंचे अनेक पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध आहेत.

            आजकाल माणुसकी कमी कमी होत चालली आहे. नात्यातील वीण घट्ट होण्याऐवजी सैल होत चालली आहे. आत्ताच्या मुलांना प्रत्येक सणासाठी किंवा उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीत "मामाच्या गावाला जाऊ या" स्वप्नवत वाटते. ना भेटणे, ना बोलणे, ना सुख:दुःखाच्या गप्पा.

आपल्या संसारात व्यस्त असणारी बहीण आणि भाऊ या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात अन् नायलाजाने आधुनिक पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात ती धन्यता मानतात कारण भावाकडे, बहिणीकडे सद्या असे सण साजरे करण्यासाठी वेळच नाही... पूर्वीचे ते प्रेम, आदर, भेटीची तळमळ, वाट पाहण्याची मज्जा, सण साजरा करण्याचा आनंद, भेट वस्तूवरून रुसवा, फुगवा, प्रेमाचे भांडण ही सर्व मजा, आनंद आज आपण  हरवून  बसलो  आहे. काही घरी आजही राखी पौर्णिमा पूर्वी सारखीच धूम धडाक्यात साजरी करताना बघावयास मिळते.

मग काय.. आपल्या घरी यंदा राखी पौर्णिमा कशी साजरी करणार?

संपूर्ण अंक वाचण्यासाठी ..     येथे क्लिक करा 


https://kutumbapp.page.link/XzpfqEiEnTfb5SuC9


साप्ताहिक शिक्षक ध्येय: रक्षाबंधन विशेषांक

_(प्रथमच अंकात चित्रपट, रेडिओ, कथा, लेख, विनोद, कविता, रांगोळी आणि बरेच काही... एकमेव परिपूर्ण डिजिटल वाचनीय अंक)_


वर्ष ४ थे; अंक २० वा; सोमवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२३


*रोखठोक* मध्ये वाचा रक्षाबंधन: काल आणि आज


आजच्या अंकातील  *रक्षाबंधन - हा हिंदी चित्रपट* नक्की बघा. 


*विशेष आकर्षण:* श्रावण महिन्यातील सण - उत्सव, श्रीम. संगीता महाजन, नाशिक


★ संपादकीय: डिजिटल रक्षाबंधन 

★ रक्षाबंधन: काल आणि आज, मधुकर घायदार, नाशिक

★ रक्षाबंधन: बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन, वसुधा नाईक, पुणे

★ रक्षाबंधन: एक धागा सुखाचा, श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर

★ रक्षाबंधन: श्रावण महिन्यातील सण - उत्सव, श्रीम. संगीता महाजन, नाशिक

★ रक्षाबंधन: भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण, नंदा परदेशी, धुळे

★ रक्षाबंधन निमित्त चांदोमामास लिहिलेले पत्र, सौ. संगीता पवार, मुंबई.

★ रक्षाबंधन: भाऊ बहिणीचे नाते दृढ करणारे, कुमार सार्थक सुनील लिंगायत, ६ वी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोळधे नं. १, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी.

★ रक्षाबंधन: भाऊ बहिणीच्या प्रेमाचे अतूट बंधन, कुमारी श्रावणी दिलीप कुंभार, ७ वी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोळधे, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी.

★ रक्षाबंधन: भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक, कुमार अथर्व विनायक कुंभार, ७ वी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोळधे नं. १, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी.

★ रक्षाबंधन: रक्षा म्हणजे रक्षण, बंधन म्हणजे धागा, कुमारी शुभ्रा विनोद सुर्वे, ४ थी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोळधे नं. १, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी.

★ रक्षाबंधन: बंध रेशमाचे.., कुमारी आनंदी सुनील अटेल, ५ वी, केसरीमल नगर विद्यालय, सिंधी, रेल्वे, जिल्हा वर्धा.

★ व्यवसाय मार्गदर्शन: झेरॉक्स दुकान कसे सुरु करावे? संपादक

★ इंग्रजी शिकू या आनंदाने - भाग ३ प्रा. सुहास पटवर्धन, बदलापूर, मुंबई

★ रेशमी बंध, नंदा परदेशी, धुळे

★ चाँद की यात्रा: आनंद जाधव, बिदर, कर्नाटक. 

★ चांद्रयान: भगवान पोटे, वर्धा.

★ माझे स्वप्न: कुमार प्रणव श्रीकांत पवार, १० वी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

★ मानवी जीवन: डी. जी. पाटील, निवृत्त मुख्याध्यापक, शहादा, जिल्हा नंदूरबार.


यासारखे अनेक वाचनीय लेख...

सोबत...


★ कविता, विद्यार्थ्यांची रंगविलेली चित्रे, रांगोळी, डिजिटलचा आविष्कार, नवी उमेद-नवी भरारी, नवी आशा - नवी दिशा, विचार सुमने, मेंदूला खुराक, थोडं हसा बरं, ग्राफीटी, सप्ताहातील फोटो, बालचित्रकला आदी अनेक वाचनीय सदरे...


एकूण पाने : 77


★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...


★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक पाठविण्यात आला आहे.


इतरांसाठी खालील ॲपवर आजचा अंक मोफत उपलब्ध

https://tinyurl.com/bddp2rje


★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...


संकेतस्थळ

https://shikshakdhyey.co.in


शिक्षक ध्येय कुटुंब ऍप

लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (32,419 सदस्य)

https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9


कौशल्य विकास ॲप

https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section


यु ट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ


नोकरीच्या जाहिराती

https://www.shikshakdhyey.in


टेलीग्राम:

https://t.me/shikshak_dhyey


इंस्टाग्राम:

https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln


फेसबुक:

https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1


फेसबुक पेज:

https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/


फेसबुक पब्लिक ग्रुप:

https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share


ट्विटर

https://twitter.com/ShikshakDhyey?s=08


*_लिंकडीन_*

https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889


*_ई मेल:_*

shikshak.dhyey@gmail.com


153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य

https://chat.whatsapp.com/FYtLywfaCEJIJHmRsc4EG9


Follow on the Koo App

https://tinyurl.com/4ks3h4cd


शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग