संपादकीय... जीवनाचा खरा मार्ग... फक्त शिक्षण मिळवून किंवा डिग्रीचा कागद मिळाला की देश सुधारत नाही तर आपल्या नसानसातून , धमन्यांमधून माणुसकी , आपुलकी आणि सौजन्य दिसून यावे. सहा आकडी पगार मिळाला की फक्त एक कुटुंब सुखी होईल पण माझ्यासोबत माझा प्रत्येक भारतीय मित्र सुखी झाला किंवा सुखी व्हावा म्हणून आपण हातभार लावला तरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सार्थक होईल. आजही देशसीमेवर सैनिक डोळ्यांत प्राण आणून आपले रक्षण करत आहेत. त्यांनी कोत्या विचारांनी आपले रक्षण करणे बंद केले तर! तर काय होईल याचे कल्पनाही करवत नाही. देशाच्या शत्रूचा सहजच देशात प्रवेश होईल. मग स्वातंत्र्य कसे अबाधित राहणार! सगळीकडे अंदाधुंदी माजेल. देशाचा पोशिंदा शेतकरी दिवस-रात्र काळ्यामातीत राबत असतो. आपल्यासाठी धान्य , फळं , भाज्या पिकवित असतो. शेतकऱ्याने आपल्यापुरतेच धान्य पिकविण्याचे ठरविले तर सारा देशच उपाशी राहील. अन्नधान्य मिळणे दुरापास्त होईल. म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने केला तरच आणि त्यादृष्टीने प्रयत्न केला तरच देशाचा सर्वांगी...
कौशल भारत - कुशल भारत