तृतीय वर्धापन दिन विशेषांक 20 एप्रिल 2023

 



संपादकीय...

काळानुसार शिक्षक बदलला... तरच विद्यार्थी बदलतील...

            साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’ हा तृतीय वर्धापन दिन विशेषांक आपल्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आज राज्यात 2200  महाविद्यालये, 19 हजार 767 माध्यमिक शाळा आणि 75 हजार 466 प्राथमिक शाळा आहेत. राज्यात शिक्षक आणि प्राध्यापकांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. विद्यार्थी संख्या तर सुमारे दीड कोटी आहे. राज्यात विविध शासकीय शाळा जसे की आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्रशाला, महानगर पालिका शाळा तसेच विविध खासगी शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा सुरु आहेत. जागतिक स्तरावर शिक्षण केंद्रांच्या आकडेवारीत आपला देश तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

             राज्यातील अनेक शाळांत जे जे चांगले घडत आहे, परिवर्तन दिसत आहे, विद्यार्थी यशाची शिखरे सर करीत आहे, येथील शिक्षक नवीन उपक्रम राबवीत कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहे, यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, उत्कृष्ठ शाळेतील आजचे खरे वास्तव समाजासमोर यावे यासाठीच या साप्ताहिकाची निर्मिती करण्यात आली आहे. आज अंकाचे सुमारे 3 लाखापेक्षा जास्त वाचक आहेत. किंबहुना राज्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाकडे हे पोहचले पाहिजे असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.   

            नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून लागू होईल. शैक्षणिक धोरणात कला, व्यावसायिक शिक्षण, पौढ शिक्षण, जल व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, योगा, शेती तंत्रज्ञान आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश करणे आवश्यक आहे. इतर देशात व्यावसायिक शिक्षण शाळेतच दिले जाते. अमेरिकेत 52 टक्के, जर्मनीत 75 आणि कोरियात 96 टक्के विद्यार्थी शाळेतच व्यवसायाचे धडे गिरवतात. भारतात हेच प्रमाण अवघे 5 टक्के आहे.

            काळानुसार शिक्षक बदलला तरच विद्यार्थी बदलतील.

            आज बऱ्याच शाळा डिजिटल झालेल्या आपण पाहतो. डिजिटल खोली, फर्निचर, रंगरंगोटी, विद्युत झगमगाट केला म्हणजे शाळा डिजिटल होत नाही. आजही काही शाळा डिजिटल असूनही तिथे विद्युत जोडणीच नाही तर काही ठिकाणी संगणक असूनही वापर नाही. काही ठिकाणी डिजिटल रुममध्ये विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसतो. खर तर डिजिटल ई-क्लास, ई-लर्निंग हे सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पूरक आहे. शासन, साहित्य, सुविधा यांवर उणिवांचे खापर न फोडता प्रत्येक शिक्षकाने ‘विद्यार्थी घडविणे’ हेच ध्येय बाळगावे, हीच एक माफक अपेक्षा!

            नेहमीच साप्ताहिकातील विविध लेखांच्या माध्यमांतून विविध शाळांमधील अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी याचे कार्य व यश समाजापुढे प्रस्तुत करणे याच उद्देशाने हे शिक्षक ध्येय साप्ताहिक सुरु करण्यात आले आहे.

तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे सर्वांकडून स्वागत होईल आणि आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.

अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

CLICK HERE 


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग