महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आणि रायगड जिल्हा शिक्षक संघटना समनव्य समिती
दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यभरात राज्य मध्यवर्ती संघटनेने बेमुदत कर्मचारी संप पुकारलेला असून या संपात रायगड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती सक्रिय सहभागी आहे.
🛑 आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की संबंधित संपामुळे आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी मान श्री राजेश सुर्वे सर राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी दि. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय आमदार श्री जयंतभाई पाटील साहेब यांना विनंती केली की ज्याप्रमाणे दिवाळीत वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ऍडव्हान्स वेतन अदा केल होत, त्याचप्रमाणे या महिन्यात बेमुदत संप सुरू असल्याने पगार उशीरा होणार असल्याने शिक्षकांची आर्थिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ऍडव्हान्स वेतन आपल्या बँकेकडून मंजूर व्हावे ही विनंती तात्काळ मान्य केली असून तशा सूचना बँकेचे सिईओ मान श्री मंदारजी वर्तक साहेब यांना केलेली आहे.
मंगळवार दिनांक 21 मार्च 2023पासून ऍडव्हान्स वाटप सुरू करण्यात येणार आहे.
रायगड शिक्षक संघटना समन्वय समिती दि.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन मान. आमदार श्री जयंतभाई पाटील साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी मान.श्री मंदारजी वर्तक साहेब यांचे हार्दिक आभार मानत आहोत.
आपला नम्र
श्री राजेश सुर्वे
राज्य अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग
