राज्याच्या शिक्षण विभागाचे होणार डिजिटायझेशन: शिक्षकांचा त्रास कमी होणार
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षण विभागांकडून विविध कार्यप्रणाली तसेच अनेक प्रकारचे सॉफ्टवेअरचा वापर होत आहे. त्यामुळे अनेकदा त्याचा राज्य पातळीवर अंमलबजावणी करताना गोंधळ होत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आस्थापना, शाळा, डाएट, विनोबा ॲप, संच मान्यता, सरल, यूडाएस असे विविध ॲप आहे. यापुढे संपूर्ण शिक्षण विभाग एकाच क्लिकवर उपलब्ध होईल. शिक्षण विभागांमध्ये जेवढी डिजिटल माध्यमे वापरली जातात, त्याऐवजी आता एकच माध्यम वापरण्यात येणार आहे. त्याबाबतचे मोबाईल ॲपचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे.
यूडाएस आणि सरल या दोन्ही वेबपोर्टलवर एकाच शिक्षकाची दोनदा माहिती भरावी लागते. त्यामुळे एक कॉमन डेटा बँक असेल, तेथून ही सर्व माहिती वापरली जाईल. सद्या यासाठीची विविध क्लिष्ट प्रक्रिया हद्दपार होणार असून शिक्षकांचा त्रास कमी होणार आहे.
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/LJMbS6vcJxW6kWq46NbPC8
शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ
%20(24).jpeg)
