National Children's Science Congress 2022
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2022
विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धा आयोजनाबाबत ....
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली सव्वीस वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी उत्तम भावी नागरिक बनावे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या वर्षीची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रत्येक जिल्ह्यातील निवडक बाल वैज्ञानिक सहभागी होऊ शकतात.
महाराष्ट्र राज्य शिक्षण कायदाअंतर्गत अभ्यासक्रमात प्रकल्प कार्य पद्धतीचा समावेश केला आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व महाराष्ट्र राज्य, विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा आपल्या विज्ञान प्रकल्प उपक्रमात राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या प्रकल्पांचा समावेश करू शकतात. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय आरोग्य व कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे हा आहे. या मुख्य विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्प बनवायचा आहे. तसेच हा गट प्रकल्प असून दोन विद्यार्थ्यांच्या गटाने विज्ञान प्रकल्पात सहभाग व्हायचे आहे.
जिल्हा पातळीवर विद्यार्थी प्रकल्प सादरीकरण स्पर्धा ऑक्टोंबर पहिल्या आठवड्यात होणार आहे . तरी आपल्या विद्यालयातील जास्तीत जास्त विदयार्थी गटांनी या मध्ये सहभागी व्हावे.
नोंदणीची अखेरची दिनांक २० ऑगस्ट २०२२ आहे
ऑनलाइन नोंदणीसाठी...
A programme of National Council for Science and Technology Communication,
Department of Science and Technology,
Government of India.
State Organizer - Jidnyasa Trust, Thane
FOCAL THEME : "Understanding Ecosystem for Health and Well Being" .
Last Date of Registration : 20 August 2022.
For Students Registration Form:
For any query Contact
Mr. Sunil Pote - 9552994294 (District Coordinator Pune)
