आधारकार्डवरील पत्ता बदलायचा आहे?

 



आधारकार्डवरील पत्ता बदलायचा आहे?


घरबसल्या मोबाईलद्वारे 5 मिनिटांत बदला Address


आज कोणतेही सरकारी काम असो की खाजगी, प्रत्येकाला आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती असते.

इतर अनेक कागदपत्रांपेक्षा हे महत्त्वाचे आहे कारण त्यात प्रत्येक नागरिकाची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. अशा परिस्थितीत आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

काही कारणास्तव आपण घर बदलतो त्यामुळे आपला पत्ता बदलला जातो. अशा वेळी आपल्याला आधार कार्डमधील पत्ता देखील बदलावा लागेल.

तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा पत्ता बदलू शकता. 

यामध्ये तुम्ही भाडे कराराचा वापर करून किंवा (कोणतेही कागदपत्रे नसतांना - खालील व्हीडिओ बघावा) आधारमध्ये तुमचा पत्ता बदलू शकाल. भाडे कराराद्वारे तुमचा पत्ता कसा बदलायचा ते आपण जाणून घेऊया.


Have you moved to a new city? Or recently changed your address? Do not forget to update your new address in your Aadhaar. You have Valid Address Proof or have received Address Validation Letter. (For those without Valid Address Proof), you can update your address.


असा करा आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट...

आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला 

https://uidai.gov.in/my-aadhaar/update-aadhaar.html

 वेबसाइटवर क्लिक करावे लागेल.

• येथे• यानंतर तुम्ही Update Address in Your Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.

• येथे तुम्हाला Update Demographics या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

• यानंतर UIDAI चे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल उघडेल,

• यानंतर Proceed to Update Aadhaar हा पर्याय निवडा.

• येथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

• यानंतर तुम्ही येथे टाकलेल्या मोबाइलवर OTP येईल.

• यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये नवीन पत्ता भरा.

• यानंतर, तुमच्या आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला ऍड्रेस  प्रूफ (घर करारनामा) स्कॅन करून अपलोड करावा लागेल.

• त्यानंतर सबमिट बटण दाबा. आधार कार्डमधील पत्ता अपडेट पूर्ण होईल,

 • यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शनमध्ये आधारमधील अपडेटेड ऍड्रेस पाहता येईल.



कोणत्याही कागदपत्रे नसताना ...

खालील व्हीडिओ बघा

CLICK HERE




https://chat.whatsapp.com/E9aTFMQy13sCFHsqog2pd2

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग