Skip to main content

प्रवास शिक्षणाचा: गुरुकुल ते ऑनलाईन

 

प्रवास शिक्षणाचा: गुरुकुल ते ऑनलाईन


 

मानसिक गुणांचे संवर्धन आणि दोषांचे उच्चाटन करते तेच खरे शिक्षण. समाजात वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजे शिक्षण.

          पूर्वीच्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल पद्धतीत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असे. त्यानंतर ब्राह्मणवर्ग वेदविद्येचे, क्षत्रिय शस्त्रविद्येचे आणि वैश्य व शुद्र आपल्या वाड-वडिलांकडील कलेचे शिक्षण घेत असत.

          आजचे शिक्षण पुस्तकापुरते मर्यादित झालेले आहे. फक्त माहितीचा पुरवठा करणारा ‘शिक्षक’ आणि ती माहिती ठराविक काळासाठी लक्षात ठेवून, उतरवून काढणारा ‘विद्यार्थी’. त्या पद्धतीला ‘परीक्षा’ असे गोंडस नाव दिले आहे.

          सद्याच्या शिक्षणात पुस्तकाबाहेरच्या कोणत्याच गोष्टींचा विचार करण्याची मुभा ना शिक्षकाला असते ना विद्यार्थ्याला. टक्केवारी मिळविण्याची जीवघेणी स्पर्धा सद्या सर्वत्र सुरु आहे.

माणूस घडविणारे शिक्षण, जे आयुष्य जगत असताना पदोपदी उपयोगी पडेल आणि विषयांचे पूर्ण आकलन आजच्या साचेबध्द पुस्तकांतून मिळताना दिसत नाही.

          सद्या विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी आहे, असे असताना आता तर शाळाच मोबाईलमध्ये बंदिस्त झाली आहे. सद्या शिक्षकांचे “मोबाईलद्वारे शिक्षण” आणि विद्यार्थ्यांचे “मोबाईलवर अभ्यास” असा सगळा ‘खेळ’ सुरु आहे. या खेळात आमचा ग्रामीण विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी पुरता हरवलेला आहे. त्याचे अस्तित्व सद्या तरी कुठे दिसत नाही. खेड्यात, आदिवासी पाड्यावर वीजपुरवठा, नेटवर्क, अॅड्रोइड मोबाईल आणि रिचार्जसाठी पैसे यांची आजही उपलब्धता आहे किंवा नाही याचा विचार होताना दिसत नाही. मागील ९ महिन्यांपासून हे ‘ऑनलाईन वर्ग’ असेच सुरु आहे.

          ऑनलाईन शिक्षणात प्रात्यक्षिकांचे काय? शिक्षणात मुलांनी काही गोष्टी हाताने करून बघायची गरज असते. फक्त डोळे आणि कान यांचा वापर करून दर्जेदार शिक्षण घेता येत नाही.

आता वेळ आली आहे, शिक्षणात आणि शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची. शिक्षकांनी देखील टेक्नोसॅव्ही होत नवीन बदल आत्मसात करायलाच हवे. काळानुसार स्वत:मध्ये बदल करून घेणे ही काळाची गरज आहे.

          ‘जीवन जगत असताना पदोपदी उपयोगात येईल असे शिक्षण मिळावे’ हिच आजच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे, ही मागणी ‘आपण’ पूर्ण करणार का?

https://shikshakdhyey.com/

Comments

Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी

  BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कामगार पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 18000 - 56,900 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026 आहे. 20 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz