Skip to main content

राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर

 



जागतिक महिला दिन विशेषांक 

साप्ताहिक शिक्षक ध्येय रविवार ८ मार्च २०२६

संपादकीय... 

 चला, समाजाच्या विचारांना नवीन दिशा देऊया!


घरातील सगळ्यांची काळजी घेणारी; परंतु स्वत:कडे दुर्लक्ष करणारी. घरातील प्रत्येकाची आवडनिवड जपणारी, परंतु स्वत:ची आवडनिवड विसरणारी. सगळ्यांना वेळेवर जेवण करण्यासाठी शिस्त लावणारी, परंतु स्वत:च्या जेवण्याच्या वेळा न पाळणारी. सर्वांसाठी ताजे पदार्थ बनविणारी, परंतु स्वत: शिळे अन्न संपविणारी. मुलांचे शिक्षण, नोकरी, घरातील वडीलधाऱ्यांची सेवा करणारी, परंतु स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य न देणारी अशी स्त्री प्रत्येकाच्या घरात नक्कीच असते. मग ती आई, मुलगी, बहीण वा पत्नी कुणीही असू शकते. मग या स्त्रीची आपण नको का काळजी घ्यायला? घरातील कामे करताना तिला भरपूर आरोग्यविषयक समस्या असतात. परंतु जेव्हा या समस्या तिच्या पेलविण्यापलीकडे जातात तेव्हा ती डॉक्‍टरांकडे जाते. जेव्हा ती आजारी पडते तेव्हाच तिचे महत्त्व कुटुंबाला कळते.

स्त्रीच्या हक्कांसाठी आवाज फक्त ८ मार्चलाच उठवला जातो का? नाही, हा लढा दररोज चालायला हवा. जेव्हा समाज खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वतंत्र विचार करू देईल, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेईल, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करेल, तेव्हाच "स्त्री-दिन" साजरा करण्याची खरी वेळ असेल!

महिला दिनाला शुभेच्छा देणं आणि स्त्रियांचं कौतुक करणं पुरेसं नाही. जेव्हा समाज स्त्रीला खरं स्वातंत्र्य, सुरक्षा आणि सन्मान देईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. स्त्री ही देवी आहे, माता आहे, सखी आहे—पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे! तिच्या अस्तित्वाचा सन्मान, तिच्या विचारांचा आदर आणि तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही संपूर्ण समाजाची आहे. जेव्हा समाज हे वास्तव स्वीकारेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-दिन साजरा होईल!

 चला, समाजाच्या विचारांना नवीन दिशा देऊया!


संपूर्ण महिला दिन विशेषांक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇

Click here इथे क्लिक करा 


राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर 


 शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. 

राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतरांना व्हावी, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : 

डॉ. नाझिया माजिद सय्यद (नाशिक); 

वनश्री साहेबराव महालकर (यवतमाळ); 

ताई सुरेश लांडे (धाराशीव); 

सौ. रोहिणी अमोल पराडकर (मुंबई); 

वंदना सालवटकर (वर्धा); 

संगीता तुळशीराम पवार (मुंबई); 

सुरेखा तात्याबा चौरे (सोलापूर); 

सरला शामराव कामे (छत्रपती संभाजीनगर);

 दुर्गा योगेश गाडेकर (बुलढाणा); 

जया अरुण बळी (बुलढाणा); 

निर्मला दिलीपराव नंदुरकर (वर्धा); 

विद्या कृष्णराव वालोकर (वर्धा); 

अस्मिता विठ्ठलराव क्षीरसागर (बुलढाणा);

 उमा भाऊराव पाटील (छत्रपती संभाजीनगर); 

कविता प्रकाश खैरनार (नंदुरबार); 

अश्विनी विशाल गिरी (नंदुरबार); 

मंगला गजानन डगवार (वर्धा); 

वर्षा सुरेशराव पवार (नंदुरबार); 

प्रियदर्शिनी नामदेवराव झोड (अमरावती);

 सौ. निर्मला रमेश मचाले (पुणे); 

पूजा प्रभाकर पवार (नाशिक); 

यशोधरा महेंद्र सोनेवाने (गोंदिया); 

सागीरा नियाजुद्दिन सिद्दिकी (वर्धा); 

सीमा गिताराम मेहत्रे (लातूर); 

सौ. वैशाली तुषार लांजेवार (वर्धा); 

भारती युवराज मराठे (नंदुरबार); 

स्वाती अरविंद वानखडे (अमरावती); 

कांचन सुनिल जाधव (रत्नागिरी); 

अनुश्री अरविंद कोपरे (वर्धा); 

मीना विजय सोनकुसले (अमरावती); 

रितू गंगाराम पुजारी (यवतमाळ); 

वसुधा वैभव नाईक (पुणे); . 

डॉ. वैशाली शांताराम शिंदे (नंदुरबार); 

मेधा निलेश चिटगोपेकर (नागपुर); 

पोलीस उपनिरीक्षक सोनी सदाशिव शेट्टी (ठाणे); 

डॉ. सुमन नवलकर (मुंबई); 

वंदना विनोदकुमार नरळे (रायगड) 

यांचा समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांचे मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सावंत, यशिता गार्डन नर्सरीचे अथर्व यशवंत गडवार, शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार; प्रभाकर कोळसे, कविता चौधरी, सुरेखा उजगरे, डॉ. फकिरा राजगुरू, डी. जी. पाटील, राजेश चायंदे, प्रेमजीत गतीगंते, भाग्यश्री पवार, मेघा पाटील, विलास मेश्राम, श्रद्धा पवार, अशरफ आंजर्लेकर, अर्चना भरकाडे, महेंद्र सोनेवाने तसेच संपूर्ण संपादकीय मंडळाने अभिनंदन केले आहे.

विजेत्या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.







Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...