Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 2 फेब्रुवारी 2026


 


संपादकीय...

 

 सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे...    

 

सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असणार्‍या आपल्या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आजूबाजूला नजर फिरविली असता प्रत्येक गल्लीत कोचिंग क्लास धुमधडाक्यात सुरू आहेत. आज बहुतेक जण आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात. खासगी क्लास लावले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, व्यावसायिक आणि शिक्षक यांची मुले देखील खासगी शाळेत शिकत आहेत. खरे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देत असतील तर सरकारी शैक्षणिक संस्था मागे का आहेत? हा प्रश्न समाजाने विचारायला हवा. आपल्या देशातील बर्‍याच राज्यातील सरकारी शाळांची नेमकी स्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक राज्यातील शिक्षण विभागात भरती नाही, अनेक पदे रिक्त आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, आश्रमशाळा, महानगरपालिका तसेच इतर सरकारी शाळा केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर विकसित केल्या पाहिजेत. आज गरीब मुलांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंत मुलांसाठी खासगी शाळा असे दोन भाग उदयास येत आहे. गरीब व श्रीमंत सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. शाळा कोणतीही असो पण एक देश, एक शिक्षण, एक गुणवत्ता असायला हवी. सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळायला हवी.

राज्यातील शाळांमध्ये उपक्रमशील शिक्षक किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. शैक्षणिक क्षेत्रात शालेय तसेच सामाजिक पातळीवर उपक्रमशील शिक्षकाकडे पाहण्याचा सहकारी शिक्षकांचा दृष्टिकोन अजूनही स्वच्छ नाही. एकतर १० पैकी एका  शाळेत एक किंवा दोन उपक्रमशील शिक्षक असतात. त्यांनाही शालेय तसेच सामाजिक स्तरावर प्रोत्साहन दिले जात नाही, ही एक शोकांतिका आहे. उपक्रमशील शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना सर्व पातळीवर सहकार्य मिळणे गरजेचे आहे कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला प्रवास करण्याचा प्रयत्न करीत असतात.

उपक्रमशील शिक्षकांना कधीच पुरस्कार, बक्षीस, प्रमाणपत्र यांची अपेक्षा नसते. समाजाकडून सन्मान आणि इतर सहकारी शिक्षकांकडून सहकार्य एवढीच किमान अपेक्षा त्यांची असते.

अंक वाचण्यासाठी ...

Click here इथे क्लिक करा




Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz