Skip to main content

बालदिन विशेषांक: राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

 



राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर 


शिक्षकांचे व्यासपीठ साप्ताहिक शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. 

या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, 'शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा, आसबेवाडी (मारापूर), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे शिक्षक ध्येयचे संपूर्ण संपादक मंडळाने अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

    राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.  अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी); क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) 

अ, ब आणि क गटातील एकूण ७५ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र यांचा समावेश आहे. 

तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.

विजेत्यांमध्ये अ गटात... पुढे संपूर्ण विजेत्यांची नावे वाचण्यासाठी....


इथे क्लिक करा.. CLICK HERE 


संपादकीय...

 

                 

शाळेत चित्रकलेस दुय्यम स्थान

 

पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. प्रयोगातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते तसेच यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यातील जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. यातूनच नवीन कल्पक, उद्योजक, कलाकार घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण व सर्जनशीलतेला वाव मिळतो. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल?

शाळेतील कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय शिक्षण हे खरे तर विद्यार्थ्यांमधील कलाकाराला साद घालणारे विषय आहेत. हे सर्व विषय व्यवस्थित शिकविले गेल्यास अनेक उद्योजक, कलाकार तयार होतील पण खरच आजकाल हे विषय शाळेत प्रभावीपणे शिकविले जातात का?

शाळा ही फक्त परीक्षार्थी बनवायची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम ती करीत असते. आजही विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव आदी तास आवडतात पण दुर्दैव असे की एकतर या विषयांना शिक्षकच नसतात त्यामुळे या तासांना गणित, इंग्रजी, विज्ञानाचा तास घेतला जातो.

माती, रंग, कागद, कात्री, डिंक, पेन्सिल आदी साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू म्हणजे हस्तकला. आजकाल शाळेत विविध प्रकारचे प्रकल्प, प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करावे असे अपेक्षित असते पण असे घडते का? एकतर घरी ‘पालक’ ते स्वत: तयार करून देतात किंवा बाजारातून रेडीमेड विकत आणले जातात, हे वास्तव आहे. एवढेच काय इंजिनिअरींगचे प्रोजेक्टही रेडीमेड विकत घेऊन सबमिट केले जातात, असे केल्याने आपले पाल्य खरच कलाकार, उद्योजक होतील?

खेदाने नमूद करावेसे वाटते की, आजही शाळांमध्ये चित्रकला, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, हस्तकला, कार्यानुभव, व्यवसाय शिक्षण इत्यादी विषयांना दुय्यम स्थान दिले जाते...?



राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद: पुरस्कार विजेते जाहीर..


या चित्रकला स्पर्धेत...

1. अहिल्यानगर, 

2. धुळे, 

3. जळगांव, 

4. नंदुरबार, 

5. पुणे, 

6. सांगली, 

7. सोलापूर, 

8. मुंबई, 

9. नवी मुंबई, 

10. पालघर, 

11. सिंधुदुर्ग, 

12. रत्नागिरी, 

13. धाराशिव, 

14. नागपूर, 

15. अमरावती, 

16. चंद्रपूर,  

17. यवतमाळ, 

18. वर्धा, 

19. गोंदिया, 

20. गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा यशस्वी केली.

  उद्या १४ नोव्हेंबर, बालदिनी राज्यातील विविध वर्तमानपत्रात, ऑनलाईन न्यूज चॅनल, यू ट्यूब न्यूज पोर्टल, दैनिकात, शैक्षणिक वेबसाईट, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मीडिया तसेच गुगल प्ले स्टोअर वरील शिक्षक ध्येय इंडिया क्लास प्लस ॲपची लिंक...

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz


वेबसाईट...

https://shikshakdhyey.co.in/


ब्लॉग...

https://kaushalyavikas.blogspot.com


या सर्व प्लॅटफॉर्मवर या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल, तसेच साप्ताहिक शिक्षक ध्येयच्या बालदिन विशेषांकात विजेत्या स्पर्धकांचे फोटो, त्यांच्या शाळेचे नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर सह राज्यस्तरावर प्रसिद्धी दिली जाणार आहे.

     शिक्षक ध्येयचे 153+ व्हॉट्सॲप ग्रुप, कुटुंब ॲप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, X, तसेच *शिक्षक ध्येयचे 100+ उपसंपादक उपसंपादिका आणि प्रतिनिधी हे त्यांच्या मोबाईल मधील सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर स्पर्धेचा निकाल फॉरवर्ड करणार आहेत.

   ज्या विद्यार्थ्यांनी विश्वासाने या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा यशस्वी केली त्यांचे आणि *ज्या शिक्षक/शिक्षिका यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे चित्र पाठविले तसेच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बघता काही शिक्षकांनी नोंदणी शुल्क स्वतः भरले आहे. काही विद्यार्थ्यांनी चित्र पाठविले आणि फोन करून सांगितले, सर, माझ्याकडे 300 रुपये नाहीत, त्या सर्वांचे चित्र स्पर्धेसाठी विचारात घेतले आहे.


 सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद..!


संपादकीय मंडळ

साप्ताहिक शिक्षक ध्येय

महाराष्ट्र




Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...