Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय, सोमवार, 8 डिसेंबर 2025

 



संपादकीय...

 

 “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!

 

अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत.

आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर यांच्या विचाराशिवाय आज तरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे.

महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण, अर्थशास्त्र, धर्माचिकित्सा, समाजकारण यांविषयी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या निर्भीड, घणाघाती पत्रकारितेबद्दल फार कमी बोललं – लिहिलं जातं. आजकाल कोणालाही न दुखवता गुळगुळीत लेखन करणारे अनेक आहेत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध घणाघाती प्रहार करीत. त्यांचे लेखन तर्कशुद्ध असे होते. त्यावेळच्या वृत्तपत्रांबाबत ते लिहितात, “महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने आहेत. व्यवसाय करतांना माध्यमांनी आपले मूलभूत कर्तव्य पाळलेच पाहिजे.”

हल्ली माध्यमे या रस्त्यापासून भरकटत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला योग्य मार्ग दाखवितात, त्यांना मानाचा मुजरा...

प्रश्न हा आहे की, आपण त्यांच्या चरित्रातून काही शिकणार आहोत का? आणि कधी? दिसायला साध्या पण प्रचंड आंतरिक उर्जा असलेल्या बाबासाहेबांचे आपण वारसदार आहोत हे प्रत्येकाने विसरता कामा नये.

        डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेली तत्वे – “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!” याबाबत आपण विचार आणि प्रत्यक्ष कृती कधी करणार आहोत?...


अंक वाचण्यासाठी ...

Click here 

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...