संपादकीय...
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गरजेचे
भारतातील शिक्षणव्यवस्थेत २४.६९ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण
शिक्षण व्यापक स्तरावर पोहोचविणे आवश्यक आहे. एका सर्वेनुसार तिसरीत केवळ ५५ टक्के
विद्यार्थी ९९ गुणांपर्यंत गुण मिळवू शकले;
तर नववीत फक्त ३१ टक्के विद्यार्थीच अपूर्णांक आणि
दशांश यांसारख्या संकल्पना योग्यरीत्या वापरू शकले.
UDISE+
(Unified District Information System for Education+) २०२४ – २५ च्या आकडेवारीनुसार,
भारतात १ लाखांहून अधिक शाळांमधे फक्त एकच शिक्षक
आहे. याशिवाय, शिक्षकांचा
मोठा वेळ शिक्षणाशी थेट संबंधित नसलेल्या कामांमध्ये खर्च होतो. जसे की प्रशासनिक
कागदपत्रे, नोंदी
ठेवणे, सर्वेक्षणे करणे
आणि अहवाल तयार करणे.
आज
शाळांमध्ये तंत्रज्ञानाने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. याचा स्वीकार
झाल्यामुळे सहकार्याच्या नवीन शक्यता आणि विचारांची देवाणघेवाण साधता येऊ लागली
आहे. या पार्श्वभूमीवर, AI साधने शिक्षकांना मोठा
आधार देऊ शकतात. ही साधने पाठांचे नियोजन,
रोजच्या कामांमध्ये मदत, अभ्यासांचे मूल्यमापन आणि
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण अशा कार्यांमध्ये मदत करू शकतात. त्यामुळे
शिक्षकांचा अशैक्षणिक कामांवर जाणारा वेळ कमी होतो आणि ते अधिक प्रभावी
अध्यापनासाठी वेळ देऊ शकतात. McKinsey च्या अहवालानुसार,
तंत्रज्ञान शिक्षकांचा 20-30 टक्के वेळ वाचवू शकते, तो वर्गात शिकविण्यासाठी
वापरता येऊ शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षणाला खऱ्या
अर्थाने सर्वसमावेशक बनविण्याच्या नव्या शक्यता निर्माण करते. हा राष्ट्रीय शिक्षण
धोरण (NEP) 2020 चा
एक प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने
पुढे जाण्यास मदत करत आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार इयत्ता तिसरीच्या वर्गापासूनच
विद्यार्थ्यांना आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) म्हणजेच
कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील धडे शिकवले जाणार आहेत. त्यासंदर्भातील निर्णयही
केंद्रानं घेतला आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या
वर्गांपर्यंत एआय आधारित विषय शिकवला जात आहे. उच्च
शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य
सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात २०२६ – २७ पासून AI हा विषय
समाविष्ट केला जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे एक विकसित होत जाणारे तंत्रज्ञान आहे. पारंपारिक शिक्षणासोबतच आता शिक्षकांनीही हे नवे तंत्रज्ञान शिकून घेणे गरजेचे आहे. भारतात AI-आधारित शिक्षणाचे भविष्य राजकीय धोरण, साधनांची उपलब्धता आणि शिक्षक यांच्या एकत्रित सहभागावर अवलंबून आहे.
संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येयचा अंक वाचण्यासाठी .....
