दीपावली
मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी साजरी करावी : पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी
यंदा
दिवाळी केव्हा आहे 20 की 21 ऑक्टोबर?
याबाबत
अनेकांच्या मनात शंका आहे. दीपावलीची लगबग एव्हाना सुरू झाली आहे. शालेय सहामाही
परीक्षा अंतीम टप्प्यात आहेत. रंग आणि किराणा यासारखी दुकाने सज्ज आहेत. सोने
चांदीसह गाड्यांची आणि घरातील आवश्यक वस्तूंसह नवीन घरे बांधून तयार आहेत. ग्राहक
राजा दीपावलीच्या प्रतिक्षेत आहे.
वसूबारस
शुक्रवारी
१७ ऑक्टोबरला वसूबारस हा महत्वपूर्ण उत्सव असून
धनत्रयोदशी
शनिवार
१८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्यतः देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची
पूजा करण्यात येते. घरात समृद्धी यावी. आर्थिक स्थिती उत्तम रहावी व कुटुंबात
धनसंपत्ती कायम राहण्यासाठी यादिवशी देवी लक्ष्मीला धण्याच्या आरास मध्ये पूजतात.
तसेच यादिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात. घरात नवीन वस्तू
सुद्धा या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेचा शुभ मुहूर्त शनिवारी १८
ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून संध्याकाळ पर्यंत आहे.
नरक चतुर्दशी
सोमवार
दि.२० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीचे धार्मिक महत्व अत्यंत आहे. यादिवशी भगवान
श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता असे मानतात. त्यानंतर श्रीकृष्णाने
आपला विजय साजरा करण्यासाठी तेलाने स्नान केले होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच या
दिवशी पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी उटणे आणि तेल लावून अभ्यंगस्नान करण्याची
पद्धत आहे. त्यानंतर कुलदेवी व घरातील देवांची पूजा करून अनेकजण सकाळी फटाके
फोडतात,फराळ खातात. काहीठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात
येतात.
फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, स्वादिष्ट फराळ अशाप्रकारे सुरु होते
दिवाळी. हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दीपावली.
लक्ष्मीपूजन
मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दीपावली आहे. दिवाळीचा
सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. याच दिवसाला खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात. या दिवशी
देवीभगवती श्री लक्ष्मीची पूजा केली जाते. यापूजेत अनेक गोष्टी मांडल्या जातात.
जसे की केरसुण्या या भगवती देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पुजण्याची पद्धत आहे.
तसेच ऊस,लाह्या बत्ताशे यांचा प्रसाद
नेवैद्य म्हणून दाखवला जातो. भगवती देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचे पूजन केले
जाते. यादिवशी घरातील मौल्यवान वस्तू,पैसे हे देखील पूजेत
मांडून पूजतात व देवीकडे सुख समृद्धी भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त ६ ते ८.३० आहे.
पाडवा
बुधवार
दि. २२ ऑक्टोबर रोजी पाडवा, बलिप्रतिपदा व वहीपूजन आहे.
दिवाळीचा
पाडवा हा खास पती पत्नीचा पवित्र सण असतो. यादिवशी पत्नी आपल्या पतीचे ओवाळून
औक्षण करते. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व आपल्या सुखी संसारासाठी सविनय प्रार्थना
करते. पाडव्याचे विशेष म्हणजे यादिवशी नवरा आपल्या बायकोला खास भेटवस्तू प्रदान
करतो. ही भेट प्रत्येक बायकोसाठी विशेष असते.
भाऊबीज
गुरूवार
दि. २३ ऑक्टोबर रोजी बहिण भाऊ यांचे पवित्र नाते सांगणारा सण भाऊबीज आहे. भाऊबीजेला
बहीण भावाचे औक्षण करते. बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ बनवणारा सण म्हणजे
दिवाळीतील हा अंतीम दिवस भाऊबीज. यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर भाऊ
बहीण दोघे तयार होतात. बहीण आपल्या भावाचे ओवाळून औक्षण करते व त्याला करगोटा
देते. भाऊबीजेला करगोटा देण्याची पद्धत अनेकठिकाणी आहे. त्यानंतर भाऊ आपल्या
बहिणीला भेटवस्तू देतो व तीला रक्षणार्थ आश्वस्त करतो.अशाप्रकारे भाऊबीजेच्या
दिवशी दीपावलीची सांगता होते.
एकीकडे आपण दीपावली विषयी वेगवेगळे मतप्रवाह ऐकत आहात. परंतु
महाराष्ट्रात मंगळवार २१ ऑक्टोबर रोजीच दीपावलीचा आम्ही निर्णय घेतला आहे.
मोहनशास्त्री दाते अर्थात दाते शास्त्री यांनी देखील आपले
पंचांगात २०२५ ची दिवाळी २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी साजरी होईल; असेच सांगितले आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन आहे कारण अमावस्या तिथी
सूर्यास्तानंतर सुरू होते. धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरला असून, बलिप्रतिपदा
२२ ऑक्टोबर आणि भाऊबीज २३ ऑक्टोबरला आहे.
पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी
(पंचांग तज्ज्ञ तथा धर्मशास्त्र अभ्यासक)
(प्रसिद्ध निरूपणकार तथा
श्रीभागवताचार्य)
येवला, जिल्हा नाशिक
