संपादकीय...
आली माझ्या घरी ही दिवाळी...
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने
दिवाळी सण साजरा करीत असतो. दिवाळी साऱ्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली
जाते. अंधारावर उजेडाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा हा सण आहे.
फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, दिवे, पणत्या, लायटिंग आदि
नेहमीप्रमाणेच साजरे करू या...
यंदा
दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या...
आपला
दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत... ‘साप्ताहिक शिक्षक
ध्येय’चा “दीपावली विशेषांक”. आपल्याच अनमोल सहकार्यातून
निर्माण झालेला एक दर्जेदार, वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक...
यंदा दिवाळी अंकात वाचा... यंदा दिवाळी केव्हा आहे? २० की २१
ऑक्टोबर? आली माझ्या घरी ही दिवाळी.. मनामनातील दिवाळी, दीपोत्सव, दीपोत्सवात
दडलेली जीवनमूल्ये, दीपावली संस्कृती, दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, आयुष्याचा
प्रवास, दिवाळी का दिवाळं सण, अहो, तुमची रोजचीच दिवाळी चांगली होणार..!, मर्यादा
पाळणे: काळाची गरज, दिवाळी का साजरी करावी?, दिवाळीत मानवतेचा दिवा लावू, लक्ष्मी
पूजन, वृद्धत्व: जीवनाची एक सुंदर सायंकाळ, क्रांतिवीर गंगाजी गांगड, पारितोषिक
प्राप्त उपक्रम, कविता, विनोद, ओळखा पाहू? सुविचार, बोलक्या रेषा, बालचित्रे,
दिवाळी स्पेशल रांगोळी, सरकारी नोकरीच्या विविध जाहिराती आणि बरेच काही... आमच्या शिक्षक बांधवांच्या लेखणीतून... वाचायलाच हवा असा अप्रतिम अंक आपल्या
सर्वांच्या सहकार्यातून आकारास आला आहे...
विद्यार्थी आणि शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी वाचन करायलाच
हवे... कारण शरीराला जशी व्यायामाची गरज
असते तशी मनाला वाचनाची. यंदा या दिवाळी अंकाचे वाचन करून स्वत:ला सिद्ध करू या...
आपले एक हक्काचे व्यासपीठ... नेहमीच...
संपूर्ण दिवाळी अंक वाचण्यासाठी..
संपादकीय मंडळ
https://www.shikshakdhyey.co.in/
