घरबसल्या मोबाईलवरुन करा लाडकी बहीण योजनेची E - KYC
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे. जुलै २०२४ लाखो महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, योजनेची पारदर्शकता आणि पात्रता सुनिश्चित करण्यासाठी E-KYC प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया न केल्यास पुढील हफ्ते बंद करण्यात येतील असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
E - KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्णतः online असून, घरबसल्या आपण आपल्या मोबाईल वरून करू शकता...
E-KYC प्रक्रिया शासनाच्या अधिकृत portal वर उपलब्ध आहे. प्रथम,
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
या वेबसाइटला भेट द्या.
प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आधार क्रमांक, त्याशी जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा.
स्टेप १:
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
ही वेबसाईट उघडा आणि E-KYC विभाग निवडा. १२-अंकी आधार क्रमांक टाका आणि captcha कोड भरा.
स्टेप २: “सहमत आहे” पर्याय निवडा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा. आधारशी जोडलेल्या मोबाईलवर OTP येईल;
स्टेप ३: OTP टाकल्यानंतर माहिती भरा, जसे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, जात श्रेणी आणि कुटुंबीयांच्या घोषणा (उदा. उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी नसणे). ही माहिती अचूक असावी.
स्टेप ४: सिस्टम बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासेल.
स्टेप ५: सर्व माहिती तपासा, सबमिट करा आणि यशस्वी संदेश प्राप्त होईल.
एसएमएसद्वारेही सूचना मिळेल; संदर्भ क्रमांक जपून ठेवा.
महाराष्ट्र शासनाचा GR वाचण्यासाठी ...
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ निवांतपणे पाहा...
https://youtu.be/Wut2Yyshd-g?feature=shared
किंवा
https://www.facebook.com/share/v/16yU2pj8oL/
मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t
क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
.jpg)