Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय शिक्षक दिन विशेषांक भाग 2 दिनांक ८ सप्टेंबर २५

 



संपादकीय...

 

शिक्षक: भावी पिढीचे शिल्पकार

 

            देश, समाज, वर्तमान, वास्तव, स्वप्न, भविष्य, व्यक्तीगत विकास यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. शस्त्राने, पैश्याने, सत्तेने, कायद्याने माणूस घडविता येत नाही पण फक्त शिक्षणानेच हे शक्य आहे ते ते घडवू शकतो फक्त एक आदर्श शिक्षकच.

            खरे शिक्षण माणसातील सर्वांगीण गुणांचा, कौशल्यांचा विकास करते. ज्या शिक्षणातून संस्कार संपन्न पिढी घडते, विचार समृद्ध होतात, राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होते तेच यशस्वी शिक्षण होय. जर्मनी, स्वीडन, जपान हे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतात. आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडे तीन टक्के खर्च केला जातो त्यात आता वाढ व्हायला हवी.

            आजचा विस्कटलेला वर्तमान आणि अंधारमय भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे उत्कृष्ठ शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा?

            अध्यापन केवळ उपजीविकेचे साधन नसून एक धर्म आहे, उपासना आहे. शिक्षण म्हणजे केवळ शब्द वाचन, चार गणिते, धडे, कविता शिकविणारी शाळा नसून एक संस्कारक्षम पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा चालविण्यासाठी आम्हाला साधक हवा फक्त शिक्षक नको. विनोबांच्या मते, शिक्षक विद्यार्थिनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे. आदर्श शिक्षक सहवास, संवाद, आचरण, चारित्र्य यांच्या माध्यमातून आदर्श आणि कर्तबगार नागरिक घडवित असतो. पाठ्यपुस्तकाबरोबरच जगाचे ज्ञान शिकवित असतो.  

            विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायम राहावे असे वाटत असेल तर शिक्षकाने जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न करायला हवे. फक्त लेखी परीक्षेपुरताच विचार न करता शिक्षकांनी शिकविण्याची प्रक्रिया विकसित केली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी त्यात एकरूप झालाच पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या येणा-या तक्रारी दूर होतील. पण, असे होत आहे का?

            प्रत्येक शिक्षकाने काळानुरुप आपल्या कल्पकतेने अध्यापनात नावीन्यपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. अध्यापनाची ठराविक योग्य दिशा ठरवायला हवी. अध्यापनाच्या सर्वांगाचा विचार करायला हवा. अध्ययन अध्यापनाच्या सिमा, कालावधी, विद्यार्थ्यांची मानसिकता, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वयंअध्ययन कार्डे, स्वाध्याय कार्डे, पी. डी. एफ, शैक्षणिक व्हिडिओ, पी. पी. टी., शिक्षकाची वेशभूषा, पुर्वाभ्यास, पूरक वाचन साहित्य, ज्ञानरचनावाद, तंत्रज्ञान, सादरीकरणातील सहजता, सुत्रबद्धता, अध्यापनाची भाषा, एकंदरच आचारसंहिता आणि अध्ययन अनुभवांची व्याप्ती असा सर्वांगाने नियोजन आराखडा करायला हवा. आजचा शिक्षक हा तंत्रस्नेही असणे फार गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्याची मानसिकता, कौटुंबिक परिस्थिती, भौगोलिक वातावरण, भाषिक स्थिती, वैचारिक पातळी या सर्व गोष्टींचा शिक्षकाने आज विचार करणे गरजेचे आहे.

            भावी पिढीचे शिल्पकार होण्याचे भाग्य आपणाला लाभले. आपण दिलेल्या ज्ञानशिदोरीचा विद्यार्थ्यांवर त्यांच्या भौगोलिक-कौटुंबिक वातावरणापेक्षा जास्त परिणाम होतो. विद्यार्थ्यांना विविध जीवनकौशल्ये, व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम बनविणे हेच खरे शिक्षण. आजुबाजूच्या समाजाची, त्यांच्या गरजांचा विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावायला हवी.

          आपला विद्यार्थी पुढे मोठ्या पदाला गेल्यानंतर प्रथम आठवण करतो तो आपल्या शिक्षकांची. त्याच्या काळजावर शिक्षकाचे नाव कायमस्वरूपी कोरलेले असते. त्यात आपले नाव असावे असे आपणास वाटते का?


Comments

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...