संपादकीय...
सर्वांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे
राज्यात
शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी व शहरी व ग्रामीण भागात मुलींना शिक्षणाच्या
प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक योजना राबविल्या जातात.
शैक्षणिक शुल्क माफ, मोफत युनिफॉर्म, पुस्तके,
शैक्षणिक साहित्य, बसभाड्यात सवलत यासारख्या अनेक योजना राबवूनही दुर्दैवाने
राज्यात अजूनही शिक्षण घेण्यात मुलींचे प्रमाण कमीच असल्याचे जाणवते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या
अहवालात लैंगिक भेदभावाच्या बाबतीत १४६ देशांमध्ये भारताचा क्रमांक १२६ वा आहे.
त्या बाबतीत भारत देश बांगलादेश, नेपाळ आणि
पाकिस्तानच्याही मागे आहे.
सरकारचे सर्वांना
शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत; पण, भारतात अजूनही मुलींच्या शिक्षणाचा आकडा
सर्वात कमी दिसतो. १९९१ च्या जनगणनेनुसार, ७ वर्षांवरील मुली आणि
महिलांची संख्या ३३ कोटी होती. त्यापैकी ४० % अशिक्षित होत्या. त्यावरुन असे
लक्षात येते की सुमारे १४ कोटी महिला अशिक्षीत किंवा कमी शिक्षित होत्या.
मुलीला
शिक्षित करणे हे बहुधा अनावश्यक म्हणून समजले जाते. मुले त्यांच्या कुटुंबाचा
उदरनिर्वाह करण्यासाठी शिकत असताना, मुलींना
घरातील कामात मदत करण्यासाठी, लहान
भावंडांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी
लहानपणापासूनच शाळेपासून दूर ठेवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंबांना
आपल्या मुलींना शिक्षण द्यावे असे वाटत नाही कारण त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च
तसेच त्यानंतर शिक्षित मुलींना द्यावा लागणारा हुंडा. मुलीं लग्नानंतर
दुसऱ्यांच्या घरी जात असल्याने, मुलींना
शिक्षण देण्यासाठी पैसे ‘वाया घालवणे’ असे पालकांना वाटते, कारण तिच्या शिक्षणाचा
उपयोग आपल्याला भविष्यात होणार नाही.
महिला सबलीकरणाच्या योजनांच्या माध्यमातून स्त्रीवर्गाच्या प्रगतीसाठी आपण
कटिबद्ध असल्याचा गाजावाजा महाराष्ट्र सरकार करत असले तरी वस्तुस्थिती मात्र फारच
वेगळी आणि विदारक आहे. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या
अहवालातून राज्यात उच्च शिक्षण घेणा-या मुलींचे प्रमाण केवळ 16.9 टक्के असल्याचे वास्तव उजेडात
आले आहे.
शिक्षणाबाबत मुले-मुलींदरम्यान भेदभाव बाळगणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा
नंबर वरचा आहे. या सर्वेक्षणात बारावीनंतरच्या शिक्षणाचा म्हणजेच पदवी, पदविका, पॉलिटेक्निक व नर्सिंग शिक्षण घेणा-या मुला-मुलींचा समावेश होता.
संपूर्ण अंक वाचण्यासाठी...
