संपादकीय...
तंत्रज्ञानाचा शाप
मोबाईल, संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया यांचे व्यसन
लहान वयातच मुलांमध्ये निर्माण होत आहे. वाचन, लेखन, विचार, एकाग्रता, संवाद कौशल्य या
सर्वांवर परिणाम होत आहे. मुलांचे बालपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकले आहे.
खेळण्याऐवजी गेम्स, बोलण्याऐवजी चॅटिंग आणि शिकण्याऐवजी व्हिडीओ पाहणे हे त्यांचे
नवे जग बनले आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही तंत्रज्ञानाचा वाईट प्रभाव दिसून
येतो. सतत स्क्रीनकडे पाहणे, झोपेचा अपुरा वेळ, अन्नाची वेळ विसरणे, एकटेपणा, चिडचिड, नैराश्य, सामाजिक अलगाव या
त्रासात वाढ झाली आहे. शहरी मुलांमध्ये स्थूलत्व, मधुमेह, रक्तदाब हे आजार
कमी वयात दिसत आहेत, यामागे स्क्रीनवर वेळ घालवण्याचे प्रमाण हे एक महत्त्वाचे कारण
आहे.
सोशल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा, फसवणूक, आत्महत्येचे
उद्भवणारे विचार, नकारात्मकतेचा प्रसार, ताणतणाव, स्पर्धेचा दबाव हेही गंभीर
प्रश्न आहेत. खरे–खोटे ओळखण्याची क्षमता कमी होत आहे. गोड बोलून फसवणाऱ्या लिंक्स, बनावट अकाऊंट्स, डेटा चोरी, गोपनीयता भंग या
गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारी हे तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे शाप
मानले जातात.
तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवरही परिणाम होतो आहे. मशीन व
ऑटोमेशनमुळे माणसांचे रोजगार कमी होत आहेत. संगणकीय प्रणाली जास्त प्रभावी
असल्यानं काही क्षेत्रांत मानवी सहभाग कमी केला जातो. त्यामुळे बेरोजगारी व
सामाजिक असमतोल वाढण्याची शक्यता आहे. अतिवापर, अयोग्य वापर आणि व्यसन
यामुळे तंत्रज्ञानाचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत.
नैसर्गिक संसाधनांचा वापर, प्लास्टिक व ई-कचऱ्याची वाढ, प्रदूषण, हवामानातील बदल हे सुद्धा
एका अर्थाने तंत्रज्ञानाच्या अतिरेकाचे परिणाम आहेत. जल, जमीन, हवा यांचे रक्षण
करण्यासाठी आपल्याला पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, अन्यथा
तंत्रज्ञानाचा शाप निसर्गाच्या रूपाने आपल्यालाच भोगावा लागेल.
आजचा साप्ताहिक शिक्षक ध्येयचा संपूर्ण अंक वाचण्यासाठी...

Comments
Post a Comment