एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग Yoga For One Earth, One Health
मधुकर घायदार नाशिक
दरवर्षी २१ जून रोजी जगभरात जागतिक योग दिन
साजरा केला जातो. या वर्षीची २०२५ ची थीम ‘एक पृथ्वी,
एक आरोग्यासाठी योग’ Yoga For One
Earth, One Health आहे.
शारीरिक, मानसिक
आणि आध्यात्मिक कल्याणासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे.
प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने
आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने
जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि
सर्वार्थाने सफल होतो. योगा हजारो वर्षांपासून संशोधित सुदृढ आरोग्याचा मार्ग आहे.
योग आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा
उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो. थोडक्यात, योगा ताणतणाव कमी करण्यास फायदेशीर
ठरतो. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता
योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण
सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल
येईल. योगाभ्यास केल्याने रक्तदाब कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि
हृदयाचे कार्य सुधारते.
श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यान
धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चिंता
आणि नैराश्याच्या लक्षणांमध्ये लक्षणीय घट झाली.
योगाभ्यासाच्या वेळी मेंदूमध्ये एंडोर्फिन आणि मूड
वाढवणारी इतर रसायने सोडल्यामुळे हे परिणाम होऊ शकतात. भावनिक नियमन चांगल्या
प्रकारे होते. तसेच निर्णयक्षमता सुधारणे आणि एकूणच मानसिक कल्याण होऊ शकते.
२७ सप्टेंबर २०१४
रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना मांडली. भारतीय परंपरेतील योगाची मुळे अधोरेखित
करताना,
पंतप्रधानांनी
शरीर आणि मनाला एकत्र आणण्याची, कल्याण वाढवण्याची आणि शांती वाढवण्याची त्याची
शक्ती याबद्दल बोलले.
११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. २०१५ पासून, हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे.
चांगले मानसिक, शारीरिक आणि भावनिक
आरोग्य,
सुसंवाद
आणि आंतरिक संतुलन राखण्यासाठी योगाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हे यामागील
उद्दिष्ट आहे.
योग शरीर, मन आणि आत्मा यांचे सुसंवाद साधण्यास मदत करतो. जगभरात या दिवशी योग सत्रे, कार्यशाळा आणि मोहिमांमध्ये भाग घेण्यासाठी एकत्र येतात, ज्यामुळे एकता आणि निरोगीपणा बळकट होतो.

Comments
Post a Comment