संपादकीय...
यंदा प्लॅस्टिक प्रदूषण संपवा
जागतिक पर्यावरण
दिनाची सुरुवात १९७२ मध्ये झाली. संयुक्त राष्ट्र महासभेने त्या वर्षी 'मानव आणि पर्यावरण' या विषयावर
स्टॉकहोम (स्वीडन) येथे पहिली जागतिक पर्यावरण परिषद आयोजित केली. या परिषदेत
पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने
जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पहिला जागतिक पर्यावरण दिन ५
जून १९७३ रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर, हा दिवस दरवर्षी विविध
पर्यावरणीय समस्यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जातो. आज १५० पेक्षा अधिक
देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
नामशेष होत चाललेल्या प्राणी व पक्ष्यांच्या जाती, हवामानातील बदल,
तापमानातील बदल, नष्ट होत चाललेली जंगले, मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्टिकचा वापर,
इलेक्ट्रोनिक कचरा, कमी होत जाणारी झाडांची संख्या, शहरातील कॉक्रिटीकरण, नदी,
नाले यातील भेसळ, आवाज, पाणी, हवा यापैकी काय शुद्ध राहिलंय? या सर्वांची जपणूक
केली नाही तर एक दिवस असा येईल की मनुष्य आणि प्राण्यांना जगणं कठीण होईल. ही सर्व
पर्यावरणाची होत चाललेली हानी आणि एकंदरीत त्यांचे दुष्परिणाम लोकांना लक्षात आणून
देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
दरवर्षी एक थीम घेऊन त्यावर पुढील वर्षभरात काम केले जाते. २०२५ या वर्षांची
थीम कोणती आहे? या वर्षीची थीम आहे 'एंड प्लॅस्टिक पोल्युशन' (End Plastic Pollution) प्लास्टिक प्रदूषण संपवा. दरवर्षी सर्वमान्य
एक थीम ठरवली जाते. पर्यावरणाशी निगडित महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश
टाकण्यासाठी, काळजी घेण्यासाठी ही थीम ठरवली जाते.
प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण हे
पर्यावरणासाठी हानिकारक आहे. माणसांसोबत प्राणी आणि पक्ष्यांसाठीही प्लॅस्टिक घातक
आहे. दरवर्षी
कोट्यवधी टन प्लॅस्टिकचा वापर केला जातो पण या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होण्याचं
प्रमाण फारच कमी आहे. प्लॅस्टिक नष्ट करणं कठीण आहे. त्यामुळे प्लॅस्टिकमुळे
होणारे प्रदूषण वेगाने वाढत आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक गोळा झालं
आहे, होत आहे. त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी संकटात आली आहे. जमिनीवर देखील आपल्या
आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग आपणास पाहायला मिळतो. गाय, बैल,
इत्यादि प्राणी न कळतपणे तो कचरा खातात अन् प्रसंगी त्यांचा यामुळे मृत्यु देखील होतो.
त्यामुळे प्लॅस्टिकचं प्रदूषण नियंत्रणात आणणं, कमी करणे नाही तर समूळ नष्ट करणे आज
काळाची गरज बनली आहे. यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरावर
बंदी घातली असतांना देखील सर्व दुकानदार सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत आणि
लोकं ती वापरत आहेत.
आज आपण ठरवू या.. की आजपासून प्लास्टिकचा वापर बंद करु
या?
संपूर्ण जागतिक पर्यावरण दिन विशेषांक वाचण्यासाठी...
