रोपटं लावा , सेल्फी काढा , बक्षीस जिंका मुखपृष्ठावर झळकण्याची संधी शिक्षक ध्येय महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा , सेल्फी काढा , बक्षीस जिंका या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुटुंबीय , मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो – सेल्फी नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून पाठवायचा. तुम्ही पाठविलेला सेल्फी साप्ताहिक शिक्षक ध्येय मध्ये राज्यस्तरावर प्रसिद्ध केला जाईल. ही नवी भन्नाट आणि अभिनव कल्पना लढवून लोकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभं करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. ' एक रोपटं लावा ' त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून खालील व्हॉट्स ॲप नंबरवर पाठवावा... 96 23 23 71 35 ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. याचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. 1) झाड देशी असावे. 2) रोपटं लावतांनाचा फोटो – सेल्फी काढतांना उभा मोबाईल धरावा. 3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेह...
कौशल भारत - कुशल भारत