राम आणि नातेसंबंध – आदर्श कुटुंबाचा मूलमंत्र लेखिका अश्विनी सुभाष दीक्षित बारामती मो. 8308897258 मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी नातेसंबंध असतात. कुटुंब, मैत्री, समाज—या सर्व नात्यांची वीण घट्ट असेल, तरच जीवन सुंदर आणि संतुलित राहते. आजच्या धकाधकीच्या युगात नात्यांमध्ये तणाव, गैरसमज, दुरावा वाढताना दिसतो. अशा वेळी श्रीरामांचे जीवन आपल्याला नात्यांचा खरा अर्थ शिकवते. रामायण केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर त्यातून आपण स्नेह, त्याग, जबाबदारी आणि विश्वास यासारख्या मूल्यांची शिकवण घेऊ शकतो. राम आणि भाऊबंदकी – प्रेम, सन्मान आणि त्याग श्रीराम आणि त्यांच्या तिन्ही भावांमधील नाते हे आजच्या काळासाठी प्रेरणादायी आहे. रामाने राज्याचा मोह सोडून वनवास स्वीकारला, आणि भरताने राज्य न स्वीकारता रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांचे प्रतीकात्मक राज्य चालवले. लक्ष्मणाने रामासोबत वनवास पत्करला आणि शत्रूंचा पराभव करण्यासाठी त्यांना साथ दिली. शत्रुघ्नानेही परिवाराची सेवा केली. आजच्या काळात भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये मालमत्तेवरून वाद होतात, संबंध तुटतात. राम ...